Advertisement

सवाई एकांकिका स्पर्धेत 'पाझर' अव्वल


सवाई एकांकिका स्पर्धेत 'पाझर' अव्वल
SHARES

दादर - सवाई एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी रविंद्र नाट्यमंदिरात बुधवारी झाली. या स्पर्धेत शेतकऱ्यांची व्यथा आणि पाण्याचे महत्त्व सांगणाऱ्या औरंगाबाद नाट्यवाडाच्या 'पाझर' या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर अनुभुती बदलापूरची 'इन द सर्च ऑफ' या एकांकिकेने द्वितीय क्रमांक पटकावला. अंतिम फेरीसाठी महाराष्ट्रातील विविध भागातील सात एकांकिकांची निवड करण्यात आली होती. या स्पर्धेचे निरीक्षण सुशील इनामदार, संपदा जोगळेकर आणि शेखर ताम्हाणे यांनी केले होते. या स्पर्धेला मनोज जोशी, नंदिता धुरी, आदिनाथ कोठारे आदी सिने दिग्गजांनीही हजेरी लावली होती.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा