Advertisement

PM मोदींची व्यक्तीरेखा साकारणार बाहुबलीतील कट्टप्पा?

अभिनेता सत्यराज यांनी याबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे.

PM मोदींची व्यक्तीरेखा साकारणार बाहुबलीतील कट्टप्पा?
SHARES

भारतीय सिनेइंडस्ट्रीतील आतापर्यंतचा ब्लॉकबस्टर ठरलेल्या बाहुबली (Baahubali) चित्रपटात कट्टप्पा या व्यक्तीरेखेने आपली छाप सोडली. कट्टप्पाची भूमिका साकारणारे सत्यराज (Sathyaraj ) यांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. सत्यराज हे पंतप्रधान मोदींच्या बायोपिकमध्ये त्यांची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. 

पंतप्रधान मोदी यांच्या आयुष्यावर आधारीत एका चित्रपटाच्या निर्मिती सुरू असल्याची चर्चा आहे. या चित्रपटात अभिनेता सत्यराज हे पंतप्रधान मोदी यांची भूमिका साकारणार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, एका तामिळ वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सत्यराज यांनी पंतप्रधान मोदींची भूमिका साकारणार का, यावर भाष्य केले आहे. 

सत्यराज करणार पीएम मोदींची भूमिका?

मिन्नम्बलम यांच्यासोबतच्या एका मुलाखतीत सत्यराज यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या बातम्यांनी मीच हैराण झालो आहे. पंतप्रधान मोदींच्या बायोपिकमध्ये मी काम करत असल्याची बातमी माझ्यासाठीही बातमी आहे. पीएम मोदींची भूमिका साकारण्यासाठी कोणीही माझ्याशी संपर्क साधला नाही. लोक सोशल मीडियावर कोणत्याही बातम्या पसरवत असतात, असेही त्यांनी म्हटले. 

सत्यराज यांनी या अफवांसाठी सोशल मीडियाला जबाबदार धरले आहे. त्यांनी म्हटले की, याआधी अशा प्रकारच्या बातम्या वृत्तपत्रांमध्ये यायच्या. आता सोशल मीडियावर कोणताही आधार, तथ्य नसलेल्या अफवा बातम्या म्हणून पसरत आहे. सोशल मीडिया हे अफवा पसरवण्याचे ठिकाण झाले असल्याचे त्यांनी म्हटले. 

पेरियारच्या विचारांचे आहेत सत्यराज...

सत्यराज हे पेरियारवादी आहेत आणि पेरियारविरोधी विचारसरणी असलेल्या कोणत्याही चित्रपटात ते काम करणार नाहीत असा दावा त्यांनी अनेकदा केला आहे. राजकीयदृष्ट्या पेरियावादाची विचारधारा आणि पंतप्रधान मोदींचा पक्ष भाजप पूर्णपणे विरुद्ध ध्रुवांवर असल्याचे दिसून येते. त्यामुळेच सत्यराज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारण्यास तयार कसे झाले, याचे अनेकांना आश्चर्य वाटत होते. 



हेही वाचा

“BIGG BOSS” मराठी सर्वांना ”वेड” लावायला येतोय...

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा