Advertisement

रामदेव बाबांनी दिला दीपिका पदुकोणला 'हा' सल्ला

जेएनयू प्रकरणावरून दीपिकावर अनेकांनी टीका केली. या सर्व प्रकरणावरून योग गुरु रामदेव बाबा यांनीही दीपिकाला एक सल्ला दिला आहे.

रामदेव बाबांनी दिला दीपिका पदुकोणला 'हा' सल्ला
SHARES

दिल्लीतील जवाहरललाल नेहरू यूनिवर्सिटीमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर दीपिकानं तिकडे जाऊन विद्यार्थांची भेट घेतली. यानंतर काहींनी तिला पाठिंबा दिला. तर काहींनी तिच्यावर टीका केली. फक्त टीकाच नाही तर तिच्या छपाक चित्रपटावर देखील बहिष्कार घातला. या सर्व प्रकरणावरून योग गुरु रामदेव बाबा यांनी दीपिकाला एक सल्ला दिला आहे.  

रामदेव बाबा म्हणाले की, "दीपिकामध्ये अभिनयाच्या दृष्टीनं कुशलता असणं वेगळी गोष्ट आहे. मात्र सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक मुद्यांचं ज्ञान घेण्यासाठी तिनं देशाबद्दल अधिक वाचणं गरजेचं आहे. हे ज्ञान मिळवल्यानंतरच तिने मोठे निर्णय घ्यायला हवेत. मला वाटतं की तिनं माझ्यासारख्या एखाद्या सल्लागाराची नेमणूक करावी, जो अशा मुद्यांवर योग्य माहिती देऊ शकेल.”

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला पाठिंबा देत रामदेव बाबा म्हणाले की, "ज्या लोकांना सीएएचा फूल फॉर्म देखील माहिती नाही ते आज या विषयावर नरेंद्र मोदींसाठी अपशब्दांचा वापर करत आहेत. पंतप्रधान आणि गृहमंत्री स्वतः म्हणाले आहेत की, हा कायदा कोणत्याही व्यक्तीचं नागरिकत्व काढून घेण्यासाठी नाही तर नागरिकता देण्यासाठी आहे. तरी देखील लोक आग लावत आहेत.”हेही वाचा

डॉक्टरांना भेटल्यानंतर अमिताभ बच्चन यांची भावनिक पोस्ट

राजकारण आणि तमाशा यांची उत्तम सांगड म्हणजे 'चंद्रमुखी'

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा