'बघतोस काय मुजरा कर'


  • 'बघतोस काय मुजरा कर'
SHARE

दादर - जेवढी श्रद्धा देवावर आहे, तेवढीच श्रद्धा मराठी माणसाची शिवाजी महारांजावर आहे. आज शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गड किल्ल्यांची अक्षरश दुरवस्था झालीय. ‘बघतोस काय मुजरा कर’ या आगामी सिनेमामध्येही काहीसा हाच आशय घेण्यात आलाय. बऱ्याच दिवसांपासून हा सिनेमा चर्चेत आहे.

या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन हेमंत ढोमे यानं केलं असून सिनेमात जितेंद्र जोशी, अनिकेत विश्वासराव यांची मुख्य भूमिका आहे. या सिनेमाचं दुसरं ब्रँड न्यू पोस्टर प्लाझा सिनेमागृह परिसरात नुकताच रिलीज झाला. या सिनेमाचं काही शूट लंडनमध्येही झालंय. त्यामुळे जर संहिता चांगली असेल तर आता मराठी सिनेमाही सातासमुद्रापलिकडे सहज जातो हेच यातून दिसून येतंय. त्यामुळे एक चांगला आशय असलेला सिनेमा प्रेक्षकांना लवकरच पाहता येईल यात शंका नाही.

संबंधित विषय
ताज्या बातम्या