या नायिका अडकणार लग्नबंधनात...


  • या नायिका अडकणार लग्नबंधनात...
  • या नायिका अडकणार लग्नबंधनात...
  • या नायिका अडकणार लग्नबंधनात...
SHARE

मुंबई - हल्ली सगळीकडे लग्नाचे वारे वाहतायत. सिलेब्रिटी मंडळीही यात मागे नाहीत. नुकतंच 'खुलता कळी खुलेना' मालिकेतील मानसी म्हणजेच मयुरी देशमुखचा विवाह पार पडला.

त्या पाठोपाठ रुंजी मालिकेतील पल्लवी पाटील ही 'पुढचं पाऊल' या मालिकेतील संग्राम समेळ याच्याबरोबर विवाह बंधनात अडकली.
अग्निहोत्र, कुंकू यासारख्या मालिकेतून आपल्या प्रत्येकाच्या मनात घर केलेल्या मृण्मयी देशपांडेचा विवाह सोहळा 3 डिसेंबरला म्हणजे शनिवारी पार पडलाय. मृण्मयी बिझिनेसमन स्वप्नील राव याच्याशी लग्न करत आहे.
'तर राधा ही बावरी' मालिकेतली अभिनेत्री श्रृती मराठेचा विवाह अभिनेता गौरव घाटणेकरशी होत आहे. हा विवाह सोहळा 4 डिसेंबर रोजी म्हणजे येत्या रविवारी संपन्न होणार आहे. मराठी मालिकांबरोबरच तिने दाक्षिणात्य सिनेमांमध्ये देखील अभिनय केलंय. श्रृती आणि गौरवची ओळख तुझी माझी लव्ह स्टोरी या सिनेमादरम्यान झाली.
एकंदरीतच 2016 या सरत्या वर्षात बरेच कलाकार विवाहबद्ध होताना दिसतायत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या