करिनाचं आठव्या महिन्यात फोटोशूट

Pali Hill
करिनाचं आठव्या महिन्यात फोटोशूट
करिनाचं आठव्या महिन्यात फोटोशूट
करिनाचं आठव्या महिन्यात फोटोशूट
करिनाचं आठव्या महिन्यात फोटोशूट
करिनाचं आठव्या महिन्यात फोटोशूट
See all
मुंबई  -  

मुंबई - लग्न झालं की बॉलिवुडमधील नायिकेच्या ग्लॅमरला ओहोटी लागते. मात्र ‘ग्लॅम दिवा’ म्हणून ओळखली जाणारी करिना कपूर त्यास अपवाद ठरली आहे. करिना वास्तव आयुष्यात आई बनणार असल्याची न्यूज बाहेर आल्यानंतरही जाहिरात जगतामध्ये ती हॉट राहिली आहे. लग्नापूर्वी करिनाकडे विविध सौंदर्यप्रसाधनांच्या जाहिरातींचा मोठा ओघ होता. त्या जाहिरातींची जागा आता मातृत्वासंदर्भातच्या गोष्टींनी घेतली आहे. एवढंच नव्हे तर करिना जसजशी मातृत्वाकडे वाटचाल करीत आहे, तसतशी ग्लॅम जगतामधील पापाराझ्झी तिचा बदलता लूक टिपण्यासाठी धडपडत आहेत. एका प्रख्यात इंग्रजी वर्तमानपत्रानं नुकतेच करिनाचे आठव्या महिन्यात फोटोशूट केलं. त्यावेळी करिना म्हणाली, “हा खूप आनंददायी प्रवास आहे. माझा आई बनण्याचा हा प्रवास कव्हर फोटो शूटच्या माध्यमातून चाहत्यापर्यंत पोहचवण्याची ही कल्पना खूप छान आहे. सर्वसाधारणपणे गरोदरपणात महिला थोड्या आळशी बनतात. मी हे करणार नाही, मी ते करणार नाही, अशी त्यांची भूमिका असते. परंतु, मी नेमकी त्या उलट भूमिका घेतली.”

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.