रंगणार आयएनटी एकांकिका स्पर्धा

 Vidhan Bhavan
रंगणार आयएनटी एकांकिका स्पर्धा
Vidhan Bhavan, Mumbai  -  

नरिमन पॉइंट - महाविद्यालयीन विश्वात अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणारी इंडियन नॅशनल थिएटर आयोजित कै. प्रवीण जोशी आंतर महाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धा सोमवार 26 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेसाठी मुंबईतील 34 महाविद्यालय सहभाग घेणार आहेत. यंदा ही स्पर्धा 26 सप्टेंबर पासुन ते 8 ऑक्टोबर दरम्यान मंत्रालय येथील यशवंत चव्हाण प्रतिष्ठान मध्ये रंगणार आहे. ही स्पर्धा तीन टप्प्यांमध्ये रंगणार आहे. पहिल्या टप्प्यात प्राथमिक स्वरुपात स्पर्धा घेतली जाते. ज्यात तालीम स्वरुपात अगदी मोजक्याच नेपथ्यासह सादरीकरण करावे लागते.त्या टप्प्यातुन पुढे निवडण्यात आलेल्या महाविद्यालयाअंतर्गत दुसरा टप्पा पार पडतो. यात महाविद्यालयांना संपूर्ण साधन सामुग्रीसह सादरीकरण करावे लागते, त्यातुन जे निवडले जातात त्यात अंतीम फेरी रंगते.

Loading Comments