SHARE

टीव्ही अॅक्टर पियूष सहदेवला २२ नोव्हेंबरला पोलिसांनी अटक केली आहे. एका महिलेनं त्याच्यावर रेपचा आरोप केला आहे. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

वरिष्ठ पोलीस निरिक्षक किरण वसंतराव काळे यांनी हिंदुस्थान टाइम्सला पियूष सचदेवला अटक केल्याची माहिती दिली. पियूषला रेप केसमध्ये अटक केली असून महिलेनं २० नोव्हेंबरला त्याच्या विरोधात एफआयआर दाखल केली आहे. पूर्ण तपास केल्यानंतरच आम्ही त्याला २२ नोव्हेंबरला अटक केली. २२ नोव्हेंबरलाच त्याला कोर्टात हजर केले. न्यायालयानं त्याला २७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली, असे स्पष्टीकरण किरण वसंतराव यांनी हिंदुस्थान टाइम्सला दिले.

पियूष सचदेव टीव्ही कलाकार असून 'गीत', 'देवो के देव महादेव' आणि 'बेहद' या मालिकांमध्ये त्यानं काम केलं आहे. कलर्सवरील देवांशी या मालिकेत पियूष दिसला होता. याशिवाय सोनी टीव्हीवरील बेहद मालिकेच्या क्रिएटीव्ह टीम मेंबरमधील एका मुलीसोबत त्याचं अफेअर सुरू असल्याची चर्चा आहे.


संबंधित विषय
ताज्या बातम्या