Advertisement

भूमी पेंडणेकरच्या 'दुर्गामती' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

दुर्गामती चित्रपटचा लक्ष वेधून घेणारा ट्रेलर अ‍ॅमेझॉन प्राइमनं रिलीज केला आहे.

भूमी पेंडणेकरच्या 'दुर्गामती' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
SHARES

भूमी पेडणेकर लवकरच दुर्गामती या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटचा लक्ष वेधून घेणारा ट्रेलर अ‍ॅमेझॉन प्राइमनं रिलीज केला आहे. या थ्रिलरपटात भूमीसह माही गिल, जीशु सेनगुप्ता आणि करण कपाडिया, अर्शद वारसी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

भूमीनेदेखील चित्रपटाचा ट्रेलर शेअर करत लिहलं की, 'दुर्गामती ट्रेलर. मी तुमच्यासोबत हा ट्रेलर शेअर करण्यासाठी बरीच वाट बघितली आहे. हे आमचे कठोर परिश्रम आहे. माझे आतापर्यंतचे सर्वात खास आणि आव्हानात्मक काम.'

पुढे भूमीनं तिचे को-स्टार अक्षय आणि दिग्दर्शकाचे आभार मानले आणि लिहिले, 'अक्षय, अशोक, विक्रम आणि भूषण कुमार यांनी माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या सर्वांसाठी फक्त प्रेम आणि कृतज्ञता'.

सत्ता आणि पैसा अशा दोन्ही गोष्टी हातात असलेल्या देशातील मोठ्या व्यक्तींच्या कटात ती आरोपी ठरते आणि त्यानंतर एका पडक्या वाड्यात तिची चौकशी केली जाते. त्या चौकशीदरम्यान त्या वाड्यात कोणकोणत्या गोष्टी घडतात आणि चंचलची दुर्गामती कशी होते याची रंजक कथा चित्रपटात पाहायला मिळेल.

चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन अशोक यांनी केलं आहे. विक्रम मल्होत्रा याचे निर्माते आहेत. भूषण कुमार यांच्या टी -सीरीज आणि अक्षय कुमारच्या केप ऑफ गुड फिल्म्स बॅनरअंतर्गत प्रस्तुत करण्यात आला आहे. 'दुर्गामती' चित्रपटाचा प्रीमियर डिसेंबरमध्ये अ‍ॅमेझॉन प्राइमवर होणार आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक अशोक ब्लॉकबस्टर तेलुगू फिल्म 'भागमती' (२०१८) साठी ओळखले जातात. 'दुर्गामती' हा चित्रपट 'भागमती'चा हिंदी रिमेक आहे. भारतासह २०० देशातील प्राइम सदस्य ११ डिसेंबर रोजी अ‍ॅमेझॉन प्राइमवर 'दुर्गामती' हा चित्रपट बघू शकणार आहेत.हेही वाचा

मल्याळम चित्रपट 'जल्लीकट्टू' ऑस्करमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार

कंगनाला हायकोर्टाकडून दिलासा, ८ जानेवारीपर्यंत अटक टळली

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement