Advertisement

मल्याळम चित्रपट 'जल्लीकट्टू' ऑस्करमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार

९३ व्या अकादमी पुरस्कारां (ऑस्कर)मध्ये 'जल्लीकट्टू' या मल्याळम चित्रपट भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे.

मल्याळम चित्रपट 'जल्लीकट्टू' ऑस्करमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार
SHARES

९३ व्या अकादमी पुरस्कारां (ऑस्कर)मध्ये 'जल्लीकट्टू' या मल्याळम चित्रपट भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. २५ एप्रिल २०२१ ला लॉस एंजिलिस इथं हा सोहळा होणार आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या १४ सदस्यांच्या समितीनं दिग्दर्शक लिजो जोस पेलिसरी यांच्या या चित्रपटाची निवड केली आहे. 'जल्लीकट्टू' या चित्रपटाची निवड सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फिचर फिल्म फॉरेन लँग्वेज कॅटेगरीत भारताच्या वतीनं करण्यात आली आहे.

हिंदी, उडिया, मराठी आणि अन्य भाषांमधील एकूण २७ चित्रपटांमध्ये 93 व्या अकादमी पुरस्कारांसाठी स्पर्धा होती. यामध्ये शुजित सरकार यांचा 'गुलाबो सीताबो', सफदर रहाना यांचा 'चिप्पा', हंसल मेहतांचा 'छलांग', चैतन्य ताम्हाणेंचा 'द डिसाइपल', विधु विनोद चोप्रांचा 'शिकारा', अनंत महादेवन यांचा 'बिटरस्वीट', रोहेना गगेरांचा 'इज लव्ह इनफ सर', गीतू मोहनदास यांचा 'मुथॉन', नीला माधव पांडा यांचा 'कलिरा अतिता', अनविता दत्त यांचा 'बुलबुल', हार्दिक मेहता यांच्या 'कामयाब' आणि सत्यांशू-देवांशू यांच्या 'चिंटू का बर्थडे' या चित्रपटांचा समावेश होता.

ऑस्करसाठी पाठवलेला जल्लीकट्टू हा चित्रपट केरळच्या इडुक्की जिल्ह्यातल्या जल्लीकट्टू या वादग्रस्त खेळावर आधारित आहे. ज्यामध्ये बैल ठार मारण्यापूर्वी गर्दीत सोडला जातो. जल्लीकट्टू चित्रपटाचा प्रीमियर सप्टेंबर २०१९ मध्ये टोरंटो फिल्म फेस्टिव्हल दरम्यान झाला होता. चित्रपटाची कथा माओवादी हरीशच्या लघुकथेवर आधारित आहे. ज्यामध्ये अँटनी वर्गीश, चेम्बन विनोद जोस, साबुमन अब्दसमद आणि सैंथी बालाचंद्रन यांनी भूमिका साकारल्या आहेत.



हेही वाचा

भाऊसाहेब शिंदेला कोणाचं 'याड' लागलं?

भारतीय वेब सीरिज 'दिल्ली क्राइम'नं पटकावला एमी अवॉर्ड

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा