Advertisement

भारतीय वेब सीरिज 'दिल्ली क्राइम'नं पटकावला एमी अवॉर्ड

४८ व्या एमी अवॉर्ड सोहळ्यात ‘दिल्ली क्राईम’ या वेब सीरिजनं आपली मोहोर उमटवली आहे

भारतीय वेब सीरिज 'दिल्ली क्राइम'नं पटकावला एमी अवॉर्ड
SHARES

४८ व्या एमी अवॉर्ड सोहळ्यात ‘दिल्ली क्राईम’ या वेब सीरिजनं आपली मोहोर उमटवली आहे. या वेब सीरिजनं सर्वोत्कृष्ट ड्रामा या विभागात पुरस्कार पटकावला आहे. या विभागात ‘बेटर कॉल सोल’, ‘द किलिंग ईव्ह’, ‘द क्राऊन’, ‘स्ट्रेंजर थिंग्ज’ यांसारख्या अनेक सुपरहिट वेब सीरिजमध्ये स्पर्धा होती.

परंतु या स्पर्धेत ‘दिल्ली क्राईम’ने बाजी मारत हा किताब आपल्या नावी केला आहे. २०१२ मध्ये दिल्लीत घडलेल्या गँग रेपवर ही सीरिज आधारित आहे. रिची मेहता दिग्दर्शित या सीरिजमध्ये शेफाली शाहनं पोलिस अधिका-याची भूमिका वठवली होती.

यावर्षी इंटरनॅशनल एमी अवॉर्ड्समध्ये भारताकडून तीन कॅटेगरीत नॉमिनेशन होते. दिल्ली क्राइमव्यतिरिक्त अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओची वेब सीरिज 'मेड इन हेवन'मध्ये मुख्य भूमिका साकारणारा अर्जुन माथूरला एमी अवॉर्ड्समध्ये बेस्ट अ‍ॅक्टर कॅटेगरीत नॉमिनेशन मिळाले होते. मात्र हा अवॉर्ड यूकेची टीव्ही सीरिज 'रिस्पांसिबल चाइल्ड'चा अभिनेता बिली बॅरेटला मिळाला.

याशिवाय कॉमेडी सीरिज कॅटेगरीत भारताकडून फोर मोर शॉट्स प्लीजला नॉमिनेशन मिळाले होते. मात्र हा अवॉर्ड नो-बॉडी लुकिंग (निन्गुएम ता ओल्हान्दो) या ब्राझिलियन कॉमेडी सीरीजनं जिंकला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच या अवॉर्डची घोषणा व्हर्च्युअली करण्यात आली. एमी हा ऑस्करप्रमाणेच टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील नामांकित पुरस्कार म्हणून ओळखला जातो. त्यामुळे हा पुरस्कार पटकवणं अनेक कलाकारांचं स्वप्न असतं. या पुरस्कारावर नाव कोरणाऱ्या कलाकारांचं जगभरातून कौतूक केलं जातं. या पार्श्वभूमीवर एका भारतील वेब सीरिजने एमी अवॉर्ड पटकावणं नक्कीच कौतुकास्पद आहे.



हेही वाचा

कंगनाला हायकोर्टाकडून दिलासा, ८ जानेवारीपर्यंत अटक टळली

भल्लाल देवची मृत्यूवर मात, अनुभव सांगताना अश्रू अनावर

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा