उफ्फ ! ये अदा...

  Mumbai
  उफ्फ ! ये अदा...
  मुंबई  -  

  'टॉयलेट एक प्रेम कथा' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारी भूमी पेडणेकर सध्या तिच्या फोटोशूटमुळे चांगलीच चर्चेत आहे. मॅगझिनच्या कव्हर फोटोसाठी हे शूट करण्यात आले. या फोटोशूटमधले काही फोटो भूमीने तिच्या ट्वीटर अकाऊंटवर शेअर केले आहेत. 


  या फोटोंमध्ये तिचा हटके अंदाज पाहायला मिळतोय. फोटोमध्ये गडद रंगाचा म्हणजेच काळ्या आणि सोनेरी रंगांचा जास्त वापर करण्यात आला आहे. गडद रंग आणि त्यात भूमीचा बोल्ड अंदाज आणि दिलखेचक अदा यामुळे सध्या ती अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. 


  भूमीने आयुषमान खुरानासोबत 'दम लगा के हयशा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटानंतर तिने स्वत:च्या शरीरावर खूप मेहनत घेतली. लवकरच ती अक्षय कुमारसोबत 'टॉयलेट एक प्रेम कथा' या चित्रपटात दिसणार आहे. पहिल्यांदाच ती अक्षयसोबत काम करणार आहे. या दोघांची प्रेमकथा लोकांच्या पसंतीस उतरते की नाही, हे ११ ऑगस्टला चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच कळेल.


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.