'चाहुल' टीमची शानदार पार्टी

  Pali Hill
  'चाहुल' टीमची शानदार पार्टी
  मुंबई  -  

  मुंबई - चाहूल मालिकेच्या शुभारंभाची शानदार पार्टी कलाकार, तंत्रज्ञांच्या उपस्थितीत नुकतीच रंगली. उत्कंठावर्धक विषय आणि तेवढ्याच रंगतदार पात्रांनी चाहूल मालिकेची कथा सजलीय. युफोरिया प्रॉडक्शन्सची चाहूल ही रहस्यमयी मालिका १२ डिसेंबरपासून कलर्स मराठीवर रात्री १०.३० वाजता प्रसारित होतेय. या मालिकेद्वारे हिंदी सिनेसृष्टीतील निर्माते आरव जिंदल हे मराठीत पदार्पण करीत आहेत.

  या मालिकेत अक्षर कोठारी, शाश्वती पिंपळीकर, लेझन, माधव अभ्यंकर, उमा गोखले, अनिल गवस, राजेंद्र शिसाटकर, विजय मिश्रा, शिल्पा वाडके, विशाल कुलथे, राधा कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका यात आहेत. सर्जेराव आणि जेनिफर यांच्या प्रेमात, त्यांच्या लग्नात अडथळा येऊ लागतो एका अज्ञात शक्तीमुळे. आणि मग प्रवास सुरू होतो एका गूढ शोधाचा, एका अमानवी रहस्याच्या भेदाचा. ही चाहूल आहे अकल्पिताची, अघटिताची आणि अधु-या राहिलेल्या एका प्रेमकहाणीची.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.