Advertisement

महिला…महिला…महिला आणि भांडायला नंबर पहिला, तृप्ती देसाईंवर सोनालीचा निशाणा

सोनाली पाटील आणि तृप्ती देसाई यांच्यातही घरातील कामांवरून वादाची ठिगणी पडल्याचं पाहायला मिळणार आहे.

महिला…महिला…महिला आणि भांडायला नंबर पहिला, तृप्ती देसाईंवर सोनालीचा निशाणा
SHARES

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये १५ वेगवेगळ्या स्वभावाचे लोकं एकत्र रहाणार म्हणजे वादविवाद होणारच, खटके उडणारच. तसंच काहीसं यावेळेस देखील दिसून येतं आहे.

उत्कर्ष शिंदेला कॅप्टनसी मिळवल्यानंतर घरातील कामाच्या वाटपावरून मात्र स्पर्धकांमध्ये वाद निर्माण झाला आहे. एकीकडे मिनल आणि जयमध्ये जोरदार भांडण पाहायला मिळालं. तर दुसरीकडे सोनाली पाटील आणि तृप्ती देसाई यांच्यातही घरातील कामांवरून वादाची ठिगणी पडल्याचं पाहायला मिळणार आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या प्रोमोमध्ये सोनालीने तृप्ती देसाई यांच्या कार्यावरून त्यांच्यावर निशाणा साधल्याचं दिसून येत आहे. घरातील कामांवरून तृप्ती देसाईंनी सोनालीवर आवाज चढवत दम भरला आहे. “मी ऐकते म्हणून काहीही बोलायचं नाही. मी बोलते त्याची नीट उत्तर द्यायची. पुरुष जर काम करू शकतात तर महिलांनी का करू नये” असं म्हणत तृप्ती देसाईंनी सोनालीला शांत राहण्याची ताकिद दिली.

त्यावर सोनाली देखील काही मागे हटलेली नाही. सोनालीनं त्यांना प्रतिउत्तर देत म्हटलं की, “महिलांनाच विरोध करायला या कायम पुढे… महिला…महिला…महिला आणि भांडायला नंबर पहिला” असं म्हणत सोनालीनं तृप्ती देसाई यांच्यावर निशाणा साधला आहे.हेही वाचा

पान मसाल्याच्या जाहिरातीवरुन वादात सापडले अमिताभ बच्चन

Big Boss Marathi 3 : खेळाच्या तिसऱ्याच दिवशी शिवलीलाला अश्रु अनावर

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा