Advertisement

अशी असेल बिग बॉसच्या घरातील नॉमिनेशन प्रक्रिया?


अशी असेल बिग बॉसच्या घरातील नॉमिनेशन प्रक्रिया?
SHARES

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामधून रविवारी राजेश शृंगारपुरे घराबाहेर पडला. त्याच्या बाहेर जाण्याने घरातील अनेक सदस्यांनी दु:ख व्यक तेलं. आता नवा आठवडा सुरू झाला आहे, त्यामुळे बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नॉमिनेशन प्रक्रियेला सोमवारी पुन्हा सुरुवात होणार असून ही नॉमिनेशन प्रक्रिया जरा वेगळी असणार आहे. कारण घरामध्ये ग्रामसभा भरणार आहे.


अशी पार पडणार नॉमिनेशन प्रक्रिया

गावांमधील कारभार ग्रामपंचायत ही स्थानिक संस्था बघते. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नॉमिनेशनसाठी अशीच एक ग्रामसभा भरणार आहे. ही एक प्रकारची पंचायत असेल. ग्रामपंचायतीचे महत्वाचे निर्णय जसं ग्रामसभेमध्ये पार पडतात, त्याचप्रमाणे या आठवड्यामध्ये नॉमिनेशन प्रक्रिया ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पार पडणार आहे.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये ग्रामीण पद्धतीने झाडाखाली पंचायत रंगणार आहे. यानिमित्ताने घरामधील सदस्यांच्या जोड्या करण्यात येतील. या दोन्ही सदस्यांनी बिग बॉस मराठीच्या घरामध्ये का रहावं तसेच दुसरा सदस्य घरामध्ये रहाण्यास कसा अयोग्य आहे? हे पंचायतीमधील इतर सदस्यांना पटवून द्यायचं आहे. जेव्हा जोडी कारणं देत असतील तेंव्हा इतर सदस्य पंच म्हणून भूमिका पार पाडतील. जोड्यांची कारणे ऐकल्यानंतर सर्व सदस्यांनी कोणा एकाला नॉमिनेट तर दुसऱ्याला सुरक्षित करायचं आहे.


या टास्कसाठी या जोडीची निवड

या टास्कमध्ये सई आणि स्मिता, रेशम आणि मेघा, जुई आणि उषा ताई, भूषण आणि आस्ताद, सुशांत आणि पुष्कर अशा जोड्या असतील. या जोड्या त्यांची मतं सदस्यांना सांगणार आहेत. ज्यामध्ये रेशम आणि मेघामध्ये बराच वाद देखील होणार आहे. रेशमने मेघाला जाब विचारला की, “तुम्ही तुमच्या घरामधील लोकांवर चिखल फेक करता... हा अधिकार तुम्हाला कोणी दिला?.” तेंव्हा आज घरातून घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये घरातील सदस्य कोणाला नॉमिनेट करतील हे बघणं रंजक असणार आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा