Advertisement

हिंदी ‘बिग बॅास’च्या घरावर मेघाची ‘धाड’

‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वाच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरणाऱ्या निर्माती-अभिनेत्री मेघा धाडेची हिंदी ‘बिग बॉस १२’मध्ये वाईल्ड कार्डच्या माध्यमातून एन्ट्री होणार आहे.

हिंदी ‘बिग बॅास’च्या घरावर मेघाची ‘धाड’
SHARES

‘बिग बॉस’च्या मराठी चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे या घरात आता मेघा धाडेचीही एन्ट्री होणार आहे. होय, ‘बिग बॅास मराठी’च्या पहिल्या पर्वाची विजेती मेघा हिंदी ‘बिग बॅास’मध्येही दिसणार आहे.


वाईल्ड कार्डद्वारे एन्ट्री

नेहा पेंडसे ही एकमेव मराठमोळी अभिनेत्री ‘बिग बॉस १२’मध्ये सहभागी झाली होती, पण नुकतीच तिचीही या घरातून गच्छंती झाली आहे. असं असलं तरी आणखी एक मराठमोळी अभिनेत्री तिची जागा घेण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वाच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरणाऱ्या निर्माती-अभिनेत्री मेघा धाडेची हिंदी ‘बिग बॉस १२’मध्ये वाईल्ड कार्डच्या माध्यमातून एन्ट्री होणार आहे.


रोहित सुचांतीचीही एन्ट्री

पुष्कर जोग, सई लोकूर यांच्यासह बऱ्याच मराठी कलावंतांसमवेत मेघाने ‘बिग बॉस मराठी’चं पहिलं पर्व गाजवलं होतं. अंतिम टप्प्यात पुष्कर आणि सईला हुलकावणी देत मेघाने विजेतेपदाला गवसणी घातली होती. आपण हिंदी ‘बिग बॉस’ची चाहती असल्याचं अनेकदा म्हणणाऱ्या मेघाचं हिंदी ‘बिग बॉस’मध्ये सहभागी होण्याचं स्वप्न या निमित्ताने साकार होणार आहे.

मेघाखेरीज ‘रिश्ता लिखेंगे हम नया’ या मालिकेत रतन सिंह ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या रोहित सुचांती याचीही वाईल्ड कार्डद्वारे ‘बिग बॉस १२’मध्ये एन्ट्री होण्याची शक्यता आहे.


म्हणून मेघाचा होकार

‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वाची विजेती असल्यानं मेघाला ‘बिग बॉस’चा खेळ कसा खेळायचा? हे चांगलंच ठाऊक आहे. असं असलं तरी ‘बिग बॉस १२’मधील मेघासमोरील आव्हानं खूप वेगळी असणार आहेत. इथला खेळ मराठीपेक्षा खूप निराळा असेल याची जाणीव कदाचित मेघाला असेलही, पण हिंदी ‘बिग बॉस’च्या प्रेमाखातर तिने वाईल्ड कार्ड एन्ट्रीसाठी होकार दिला आहे. आता हिंदीतील हा डाव मेघा कसा खेळते ते पाहायचं आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा