Advertisement

मेघा धाडे बनली ‘बिग बॅास’ची ‘सुपरस्टार’

‘बिग बॅास’ मराठीच्या फिनालेमध्ये अभिनेत्री मेघा धाडे हिने सर्व स्पर्धकांवर मात करत बिस बाॅसची सुपरस्टार होण्याचा मान पटकावला आहे.

मेघा धाडे बनली ‘बिग बॅास’ची ‘सुपरस्टार’
SHARES

गेल्या १०० दिवसांपासून सुरू असलेल्या नाट्याचा, भांडणांचा आणि एकमेकांवर कुरघोडी करणाऱ्या ‘टास्क’चा आज समारोप झाला. ‘बिग बॅास’ मराठीच्या फिनालेमध्ये अभिनेत्री मेघा धाडे हिने सर्व स्पर्धकांवर मात करत बिस बाॅसची सुपरस्टार होण्याचा मान पटकावला आहे. स्मिता गोंदकर आणि पुष्कर जोग या फायनल-३ मध्ये पोहोचलेल्या तगड्या स्पर्धकांवर मात करत मेघानं ‘बिग बॅास’च्या पहिल्या पर्वाच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे.


आस्ताद, सई बाहेर

वाईल्ड कार्ड एंट्री करणारी शर्मिष्ठा राऊत आज सुरुवातीलाच बाहेर पडल्यानंतर गेल्या १०० दिवसांपासून राहत असलेल्या स्पर्धकांमधूनच विजेता होणार, हे निश्चित झालं होतं. सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी पाचव्या आणि चौथ्या क्रमाकांच्या सदस्यांची घोषणा केली. आस्तादला पाचव्या, तर सईला चौथ्या क्रमांकावर समाधान मानत ‘बिग बॅास’च्या घरातून बाहेर पडावं लागलं. त्यानंतर उरलेल्या तीन सदस्यांमध्ये कोण बाजी मारणार? याची उत्सुकता अधिकच वाढली.


मेघा, पुष्करमध्ये रंगली चुरस

‘बिग बॅास’मध्ये पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांची भरभरून मते मिळवणाऱ्या स्मिता गोंदकरचा तिसरा क्रमांक आल्यानंतर स्मिता आणि पुष्कर या कडव्या प्रतिस्पर्ध्यांमध्ये यांच्यात पहिल्या क्रमांकासाठी लढत होणार, हे नक्की झालं. त्यानंतर सर्वांचेच श्वास रोखले गेले. महेश मांजरेकरांनी मेघा विजयी झाल्याची घोषणा करताच संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा, शिट्यांचा कडकडाट झाला. सर्व स्पर्धकांनी मेघाचं कौतुक केलं.


सुपरस्टार मेघा

‘सुपरस्टार’ या मराठी सिनेमाच्या निर्मितीसोबतच सिद्धार्थ जाधवसोबत मुख्य भूमिका साकारणाऱ्या मेघालाच पसंती देत प्रेक्षकांनी तिला ‘बिग बॅास’चीही ‘सुपरस्टार’ बनवलं आहे. मराठी ‘बिग बॅास’च्या पहिल्या पर्वाची अंतिम फेरी घरातून बाहेर पडलेल्या रेशम टिपणीस, राजेश श्रृंगारपुरे, सुशात शेलार आदी सदस्यांच्या परफॅार्मंसमुळे अधिकच रंगतदार बनली.


हेही वाचा -

मेघा, शर्मिष्ठा आणि पुष्कर शिक्षकांच्या भूमिकेतRead this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा