Advertisement

बॉलीवूडवर सलमान-दीपिकाचंच राज्य!


बॉलीवूडवर सलमान-दीपिकाचंच राज्य!
SHARES

पूर्वी वर्षानुवर्षे एकच कलाकार शिखरावर विराजमान असायचा. कारण त्या काळी लोकप्रियतेचं मोजपाम करण्याची साधनं नव्हती. पण आज तसं नाही. मागील काही वर्षांपासून सक्रीय झालेल्या सोशल मीडियामुळे कोणता कलाकार शिखरावर आहे हे आज अचूकपणे ओळखता येतं. यावरूनच डिजीटल विश्वावर सध्या बॉलीवूडवर सलमान खान आणि दीपिका पदुकोण यांचं राज्य असल्याचं सिद्ध झालं आहे.डिजीटल न्यूज चार्ट

२०१७-२०१८ मध्ये दीपिका पदुकोण आणि सलमान खानचीच डिजीटल विश्वावर सत्ता होती, हे नुकतंच समोर आलं आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या सर्वेक्षणानुसार, २०१७ ते सप्टेंबर २०१८ या वर्षात डिजीटल न्यूज चार्टवर सर्वाधिक जास्त सलमान ‘भाई’ आणि ‘राणी पद्मावती’ दीपिका पदुकोण हे दोन आघाडीचे कलाकार अग्रस्थानी असल्याचं दिसतं आहे.


स्कोर ट्रेंड्सचा अहवाल

स्कोर ट्रेंड्स इंडियाव्दारे प्रसिध्द करण्यात आलेल्या वार्षिक अहवालानुसार, ५२ आठवड्यांमध्ये सलमान प्रथम क्रमांकावर होता. तर किंग खान शाहरुख दुसऱ्या स्थानावर, अमिताभ बच्चन तिसऱ्या स्थानी, अक्षय कुमार चौथ्या आणि रणवीर सिंह पाचव्या स्थानी होते. त्याचप्रमाणे ५२ आठवड्यांमध्ये दीपिका पहिल्या स्थानी, प्रियंका चोप्रा दुसऱ्या क्रमांकावर, सोनम कपूर तिसऱ्या स्थानी, आलिया भट्ट चौथ्या आणि अनुष्का शर्मा पाचव्या क्रमांकावर होती.


पकड मजबूत

अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही यादी घोषित केली आहे. स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्विनी कौल यांच्या म्हणण्यानुसार, समोर आलेल्या आकड्यांवरून ५२ आठवड्यांमध्ये ‘पद्मावत’ चित्रपटामुळे निर्माण झालेली कॅान्ट्रोव्हर्सी आणि लग्नाविषयीच्या सतत चर्चेत असलेल्या बातम्यांमुळे दीपिकाच्या लोकप्रियतेत वाढ झाली. तर ‘बिग बॉस’, ‘टायगर जिंदा है’, ‘रेस ३’, आणि आगामी ‘भारत’ या चित्रपटांमुळे सलमान लोकप्रियतेच्या शिखरावर राहिला. गेल्या ५२ आठवड्यांमध्ये सलमान आणि दीपिका यांनी डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मवर आपली पकड मजबूत केली आहे.हेही वाचा -

निर्माता अमोल कागणेने अभिनेता बनण्यासाठी वाढवलं वजन!

‘गॅटमॅट होऊ देना…’ म्हणत अवधूतने छेडला तरुणाईचा सूर
 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा