Advertisement

‘गॅटमॅट होऊ देना…’ म्हणत अवधूतने छेडला तरुणाईचा सूर


‘गॅटमॅट होऊ देना…’ म्हणत अवधूतने छेडला तरुणाईचा सूर
SHARES

मराठी सिनेसृष्टीत रॉकिंग गाण्यांसाठी ओळखरला जाणारा गायक-संगीतकार-दिग्दर्शक-निर्माता अवधूत गुप्तेचं एक नवकोरं गाणं नुकतंच सोशल नेट्वर्किंग साईटवर लाँच झालं आहे. ‘गॅटमॅट होऊ देना…’ असे या गाण्याचे बोल आहेत. हे गाणं सध्या कॉलेज तरुणांना अक्षरशः खूळ लावत आहे.




चित्रपटाचं शीर्षकगीत

यूथला आपल्या तालावर थिरकवणारं हे रॉक गाणं आगामी 'गॅटमॅट' मराठी चित्रपटाचं शीर्षकगीत आहे. १६ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 'गॅटमॅट' च्या निमित्ताने अवधूत पुन्हा एकदा ऑनस्क्रीन झळकणार असल्यामुळे त्याच्या चाहत्यांसाठी हे गाणं खऱ्या अर्थानं रॉकिंग ठरत आहे. गायन, संगीत, दिग्दर्शन, निर्मिती आणि प्रस्तुतकर्ता अशी चौफेर कामगिरी करणाऱ्या अवधूतने यापूर्वी ‘मंकी बात’ या चित्रपटात भगवान श्रीकृष्णाची भूमिका साकारली होती.




उडती चाल

सचिन पाठक लिखित ‘गॅटमॅट होऊ देना…’ या उडत्या चालीच्या गाण्याला समीर साप्तीस्करने संगीत दिलं आहे. अवधूतने हे गीत पडद्यामागे आणि पडद्यावरही त्याच्या 'स्टाईल'ने गायलं आहे. हे गाणं कॉलेज विश्वातील सळसळत्या तरुणाईला आकर्षित करणारं आहे.


प्रेमी जोडप्यांसाठी खास

प्रेमाची गुलाबी छटा एका नव्या ढंगात मांडणारा 'गॅटमॅट' हा सिनेमा प्रेमी जोडप्यांसाठी खास असणार आहे. अवधुत गुप्ते यांची प्रस्तुती आणि यशराज इंडस्ट्रीज यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन निशीथ श्रीवास्तव यांनी केलं आहे. या चित्रपटात अक्षय टंकसाळे, निखिल वैरागर, रसिका सुनील आणि पूर्णिमा डे हे मराठीतील तरुण कलाकार आहेत.



हेही वाचा-

मराठी सिनेमाला मल्याळमचा रॉकींग स्पर्श

बहुचर्चित ‘मुळशी पॅटर्न’ची झलक



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा