Advertisement

कंगनाच्या घरात 'इतकं' अनधिकृत बांधकाम, महापालिकेनं यादीच केली जाहीर

पालिकेनं एक यादी जाहीर केली आहे. या यादीत कंगनाच्या कार्यालयातील बांधकाम कसं बेकायदेशीर आहे, याचं वर्णन केलं आहे.

कंगनाच्या घरात 'इतकं' अनधिकृत बांधकाम, महापालिकेनं यादीच केली जाहीर
SHARES

अभिनेत्री कंगना रणौतच्या कार्यालयातील बेकायदा बांधकामांची महापालिकेनं बुधवारी तोडफोड केली. महापालिकेची ही कारवाई सकाळी ११ वाजता सुरू झाली आणि २ तास चालली. मात्र, पालिकेच्या या कारवाईविरोधात कंगनाच्या वकिलांनी हायकोर्टात अर्ज दाखल केला असून त्यावर सुनावणी अद्याप बाकी आहे.

यापूर्वी, मंगळवारी पालिका कर्मचाऱ्यांनी कंगनाच्या कार्यालयाबाहेर नोटीस चिकटवली होती आणि जाब विचारला होता. पण कंगनाकडून दिलासादायक उत्तरं आणि कारणं पालिकेला मिळाली नाहीत.

त्यामुळे कंगनाच्या कार्यालयावर कारवाई करण्यात आली. पण कंगनानं हायकोर्टात याचिका दाखल केल्याचं केळताच पालिकेनं काम थांबवलं. तुर्तास हायकोर्टानं पालिकेच्या कारवाईला स्थगिती दिली आहे.  

कंगनानं एक ट्विट करत दावा केला की, माझ्या कार्यालयात कुठलही अनधिकृक बांधकाम झालं नाही. पण यावर उत्तर देत पालिकेनं एक यादी जाहीर केली आहे. या यादीत कंगनाच्या कार्यालयातील बांधकाम कसं बेकायदेशीर आहे, याचं वर्णन केलं आहे.

१. कंगनाच्या ऑफिस 'मणिकर्णिका' च्या तळ मजल्यावरील टॉयलेटला ऑफिस केबिन बनवण्यात आलं आहे.

२. मणिकर्णिकाच्या स्टोअर रूमला किचनचं रूप देण्यात आलं आहे.

३. स्टोअरमध्ये आणि पार्किंगच्या ठिकाणी पायर्‍याजवळ नवीन शौचालयं बांधली जात आहेत.

४. तळ मजल्यावर पॅन्ट्री तयार केली जात आहे.

५. पहिल्या मजल्यावर, लिव्हिंग रूममध्ये लाकडी विभाजन टाकून एक केबिन बनवलं गेलं आहे.

६. पहिल्या मजल्यावरील पूजा कक्षात एक केबिनचं विभाजन केलं गेलं आहे.

७. पहिल्या मजल्यावरील खुल्या चौकात शौचालय बांधलं गेलं आहे.

८. दुसर्‍या मजल्यावरील पायऱ्या बदलल्या आहेत.

९. पहिल्या मजल्यावर बेकायदेशीरपणे स्लॅब बनवला गेला आहे.

१०. दुसर्‍या मजल्यावरील भिंत तोडून एक बाल्कनी तयार केली आहे.

या कारवाईसंदर्भात पालिकेनं सांगितलं की, कंगनाला नोटीस मिळाल्यानंतरही आपण काम चालू ठेवलं. म्हणूनच सूचनेनुसार त्यांची त्वरित तोडफोड केली जाते. आपण स्वत: यासाठी जबाबदार आहात. हे काम केवळ आपल्या खर्चावर केलं जाईल. पालिकेनं कंगनाला तिच्या कार्यालयात बेकायदा बांधकामांबाबत चार नोटीस बजावल्या होत्या.



हेही वाचा

कंगनाच्या कार्यालयावरील कारवाईला हायकोर्टाची स्थगिती

पालिकेच्या कारवाईनंतर कंगना पुन्हा बरळली, मुंबईला म्हणाली पाकिस्तान

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा