कौन बनेगा करोडपतीच्या ९ व्या भागाचं शूटिंग अमिताभ बच्चन करणार नाहीत. हे ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल. तुमचा यावर विश्वास बसत नसेल. पण आम्ही तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो. या व्हिडिओत तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील.
आता तरी बसला की नाही तुमचा विश्वास. अमिताभ बच्चन यांनी केबीसीच्या ८ भागात सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडली होती. आता ९ व्या भागात अभिषेक बच्चन सूत्रसंचालन करणार आहे आणि हॉट सिटवर अमिताभ बच्चन पाहायला मिळतील.
अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन या पिता-पुत्रांची जोडी आपण अनेक चित्रपटांमध्ये पाहिली असेल. पण पहिल्यांदाच ही जोडी छोट्या पडद्यावर झळकणार आहे. या कार्यक्रमाचं नुकतंच शुटिंग झालं.
खरंतर अमिताभ हेच कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहेत. या भागात पाहुणा खेळाडू म्हणून अभिषेक बच्चन आला होता. या वेळी गंमत म्हणून अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांनी आपली जागा बदलली होती. या भागात अमिताभ बच्चन यांनी अभिषेकची अनेक मुद्द्यांवरून टेर खेचली. या भागात दोघांची मजा आणि मस्ती पाहून प्रेक्षकांना देखील हसू आवरलं नाही.
हेही वाचा
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)