Advertisement

लॉकडाऊनमध्ये केला 'हा' प्रताप, मॉडल पूनम पांडेला अटक

बॉलिवूड अभिनेत्री पूनम पांडे अनेकदा हॉट फोटो आणि व्हिडिओंमुळे चर्चेत असते. पण आज ती चर्चेत आहे एका वेगळा कारणामुळे...

लॉकडाऊनमध्ये केला 'हा' प्रताप, मॉडल पूनम पांडेला अटक
SHARES

सध्या कोरोनामुळे (Coronavirus Live Update) देशभरात लॉकडाऊन (Lockdown 30) लागू करण्यात आलं आहे. लॉकडाऊन असलं तरी कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत (Coronavirus in MUmbai) आढळत आहेत. त्यामुळे अधिक चिंता वाढली आहे. अशा परिस्थितीतही नागरिक लॉकडाऊनचं पालन करातान दिसत नाहीत. याचा नाहक त्रास पोलिसांना सहन करावा लागत आहे. आतापर्यंत लॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्या अनेकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. आता या यादीत मॉडल आणि बॉलिवूड अभिनेत्री पुनम पांडे (Poonam Pandey)च्या नावाचा समावेश झाला आहे.


'या' कारणामुळे अटक

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री पूनम पांडे अनेकदा हॉट फोटो (Hot Photos) आणि (Hot videos) व्हिडिओंमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर ती नेहमीच काही ना काही शेअर करते. त्यावरून अनेकदा वाद निर्माण झाला आहे. आता अशी बातमी येत आहे की, पूनम पांडेला अटक (Arrest) करण्यात आली आहे.

लॉकडाऊनचं (Lockdown in Mumbai) उल्लंघन केल्याबद्दल पूनमला अटक करण्यात आली आहे. ती तिच्या बीएमडब्ल्यू (BMW) कारनं फिरत होती. त्यावेळी मरीन ड्राइव्ह (Marine Drive Police) पोलिसांनी तिला रविवारी रात्री ८ च्या आसपास अटक केली. पुनम पांडेसोबत पोलिसांनी आणखी एका व्यक्तीला अटक केली आहे.


वादग्रस्त सोशल मीडिया क्विन

पूनम पांडे सोशल मीडियावर खूप सक्रियं असते. चाहत्यांना तिचा बोल्ड आणि हॉट अवतार आवडतो. तिचा इन्स्टाग्राम हॉट फोटोज आणि व्हिडिओंनी भरलेला आहे. इन्स्टाग्रामवर तीस लाख लोक तिला फॉलो करतात. पूनम पांडेनं मॉडेलिंगपासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. पूनम पांडेनं २०१३ मध्ये नशा या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. ५ चित्रपटात काम केलेल्या पुनमनं एका टीव्ही मालिकेतही काम केलं आहे. २०१५ साली तिनं एक टीव्ही शो केला होता.

नुकतंच पूनम पांडेनं तिच्या प्रियकरसोबत सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. यानंतर पूनम पांडेच्या सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. फोटोमध्ये पूनम तिच्या बॉयफ्रेंडला किस करताना दिसत आहे.View this post on Instagram

Caption this.

A post shared by Poonam Pandey (@ipoonampandey) on


२०११ साली तिनं भारतीय टीम वर्ल्ड कप जिंकल्यास नग्न होणार असं वचन दिलं होतं. पण तिच्या या निर्णयाला बीसीसीआयनं नकार दिला आणि चाहत्यांनी देखील राग व्यक्त केला. त्यानंतर तिनं हा निर्णय मागे घेतला. काही महिन्यांपूर्वी ती शिल्पा शेट्टीच्या नवऱ्याविरोधात हायकोर्टात गेली होती.  हेही वाचा

'असं' करा KBC 12 चे ऑनलाइन रजिस्ट्रेशन

'ते' मेसेज फॉरवर्ड करणाऱ्यांना सायबर पोलिसांचे आवाहन, सेलिब्रिटींचीही साथ

संबंधित विषय
Advertisement