Advertisement

विजय चव्हाण, म़णाल कुलकर्णी यांना व्ही.शांताराम पुरस्कार जाहीर

प्रसिद्ध अभिनेते विजय चव्हाण आणि अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांना चित्रपती व्ही. शांताराम पुरस्कार जाहीर करण्यात आला. तसंच ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना राज कूपर जीवनगौरव पुरस्कार आणि प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांना राज कपूर विशेष योगदान पुरस्कार जाहीर करण्यात आला.

विजय चव्हाण, म़णाल कुलकर्णी यांना व्ही.शांताराम पुरस्कार जाहीर
SHARES

महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या ५५ व्या मराठी चित्रपट पुरस्कारांची रविवारी घोषणा झाली. यांत प्रसिद्ध अभिनेते विजय चव्हाण आणि अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांना चित्रपती व्ही. शांताराम पुरस्कार जाहीर करण्यात आला. तसंच ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना राज कूपर जीवनगौरव पुरस्कार आणि प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांना राज कपूर विशेष योगदान पुरस्कार जाहीर करण्यात आला. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. यावेळच्या ५५ व्या राज्य मराठी चित्रपट महोत्सवात या पुरस्कारांचं वितरण करण्यात येईल.



हास्याचा झरा विजय चव्हाण

'मोरूची मावशी' च्या रूपाने सुरू झालेल्या हास्यप्रवासात तब्बल ४ दशकं प्रेक्षकांना खळखळून हसवणारे अवलिया कलावंत म्हणजे विजय चव्हाण. विजय चव्हाण यांनी मराठी नाट्यसृष्टी चित्रपटसृष्टीत सहाय्यक कलाकार म्हणून एण्ट्री केली असली तरी आपल्या अचूक टायमिंगच्या आधारे त्यांनी तमाम रसिकांचं मन अल्पावधीतच जिंकून घेतलं. त्यांच्या श्रीमंत दामोदर पंत, तू तू मी मी हे नाटक असो की ‘झपाटलेला’, ‘पछाडलेला’, ‘भरत आला परत’, ‘जत्रा’, ‘घोळात घोळ’, ‘आली लहर केला कहर’, ‘माहेरची साडी’, ‘येऊ का घरात’ यांसारख्या अनेक चित्रपटांतील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या. 



दमदार अभिनेत्री मृणाल कुलकर्णी

मृणाल कुलकर्णी यांनी मराठी-हिंदी चित्रपट, नाटक, टीव्ही मालिका अशा या तिन्ही क्षेत्रात आपला ठसा उमटवला. तर ‘रमा माधव’ या मराठी चित्रपटाचं दिग्दर्शन करत त्यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. विद्यार्थी दशेतच त्यांनी ‘स्वामी’ या मालिकेतून अभिनय कारकिर्द सुरू केली. ‘राजवाडे अँड सन्स’, ‘कशाला उद्याची बात’, ‘यल्लो’ या मराठी चित्रपटांमध्ये मृणाल यांनी विविध भुमिका साकारल्या. त्यासोबत ‘आशिक’, ‘राम गोपाल वर्मा की आग’, ‘रास्ता रोको’, ‘छोडो कल की बातें’, ‘मेड इन चायना’ या हिंदी चित्रपटांमधूनही मृणाल कुलकर्णी यांनी आपल्या अभिनयाची झलक दाखवली. ‘राजा शिवछत्रपती’, ‘मीरा’, ‘स्पर्श’, ‘गुंतता ह्दय हे’, ‘अवंतिका’ या टीव्ही मालिकांमधील त्यांच्या कामाचंही प्रेक्षकांनी कौतुक केलं.



बाॅलिवूडचे हिमॅन धर्मेंद्र

दोन दशकाहून अधिक काळ हिंदी सिनेमाची सिल्वर स्क्रीन गाजवणारा हिमॅन अभिनेता म्हणजे धर्मेद्र. १९६० साली अभिनय क्षेत्रात पदार्पण केल्यापासून धर्मेद्र यांनी आतापर्यंत सुमारे २५० हून अधिक सिनेमांत भूमिका साकारल्या. ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या सिनेमांतून त्यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. १९७६ ते १९८४ च्या काळात त्यांनी अनेक ॲक्शनपट केले. 'शोले' ‘जुगनू’, ‘ललकार’, 'आखे'. ‘ब्लॅकमेल’, ‘यादों की बारात’ असे त्यांचे सिनेमे त्याकाळी सुपरहिट गेले.



हरहुन्नरी राजकुमार हिराणी

प्रसिद्ध सिनेनिर्माते विधू विनोद चोप्रा यांचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून राजकुमार हिराणी यांनी चित्रपट दिग्दर्शनाला सुरवात केली असली, तरी 'मुन्नाभाई एमबीबीएस' या सिनेमाद्वारे हिराणी यांनी स्वत:ला बाॅलिवूडमधील प्रमुख दिग्दर्शकांच्या पंक्तीत नेऊन बसवलं. त्यानंतर ‘लगे रहो मुन्ना भाई’ आणि ‘३ इडियट्स’ या सिनेमांतून त्यांनी आपल्या वेगळ्या शैलीची छाप बाॅलिवूडवर सोडली.



हेही वाचा-

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार घोषित; 'या' मराठी चित्रपटानं मारली बाजी!

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या यादीत नागराज मंजुळेंंचं नाव



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा