Advertisement

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या यादीत नागराज मंजुळेंंचं नाव


राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या यादीत नागराज मंजुळेंंचं नाव
SHARES

शुक्रवारी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आलीयावेळी 'कच्चा लिंबू' या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून घोषित करण्यात आलेत्याचप्रमाणे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यासाठीही शुक्रवारचा दिवस खास ठरलानागराज मंजुळे यांच्या 'पावसाचा निबंध' या लघुपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.



राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या घोषणेनंतर नागराज मंजुळेंनी सोशल मीडियाद्वारे आपला आनंद व्यक्त केला आहेया वेळी त्यांनी एक फोटो शेअर केला आहेहा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये नागराज म्हणतात, 'पावसाच्या निबंधच्या नावानं चांगभलंआजच लॉस एंजेलिस येथे 'पावसाचा निबंध'चा वर्ल्ड प्रिमिअर होतोय आणि आजच ही आनंदाची बातमी आलीअभिनंदन टीम आटपाट'!.

'फॅन्ड्री' चित्रपटाद्वारे नागराज मंजुळे यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलंत्यानंतर दोन वर्षांपूर्वी आलेल्या 'सैराट' या चित्रपटामुळे त्यांनी घवघवीत यश मिळालं.



हेही वाचा

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार घोषित; 'या' मराठी चित्रपटानं मारली बाजी!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा