मराठमोळी रिना पुन्हा बॉलिवूडमध्ये झळकणार

 Pali Hill
मराठमोळी रिना पुन्हा बॉलिवूडमध्ये झळकणार

मुंबई - बॉलिवूडमधील ग्लॅमर आणि प्रसिद्धी अनुभवण्यासाठी मराठीतील अनेक नायक-नायिका प्रयत्न करताना दिसतात. आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठीतील अनेक कलाकारांनी बॉलिवूडमध्ये यशस्वी कूच देखील केली आहे.

 

या मराठी व्हाया हिंदी सिनेसृष्टीत प्रवास करणाऱ्या कलाकारांमध्ये अभिनेत्री रीना अगरवाल हिचा देखील समावेश झाला आहे. नुकताच 'झाला भोबाटा' या मराठी सिनेमातून प्रेक्षकांसमोर आलेली रीना लवकरच बॉलिवूडच्या बिग बजेट सिनेमात झळकणार आहे.

अजय के. पन्हालाल दिग्दर्शित 'बेहेन होगी तेरी' या सिनेमातून रीना पुन्हा एकदा बॉलिवूडच्या प्रसिद्ध कलाकारांसोबत कॅमेरा शेअर करताना दिसणार आहे.श्रृती हसन आणि राजकुमार राव ही जोडगोळी असलेल्या या सिनेमात मराठमोळ्या रीनाची कोणती भूमिका असेल हे लवकरच कळेल. या सिनेमाचं चित्रीकरण सध्या लखनऊमध्ये सुरू आहे.

 

यापूर्वी रिनाने अामीर खानच्या तलाश या सिनेमात अभिनय केला होता. यात ती एका महिला पोलीस हवालदाराच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आली होती.

रिनाने छोट्या पडद्यावरील 'एजंट राघव' या हिंदी मालिकेतही काम केलं होतं. मात्र रिनाला जरी बॉलिवूड खुणावत असलं तरी तिनं मराठी इंडस्ट्रीला कधीच दुय्यम लेखलं नाही हे मात्र नक्की.

Loading Comments