Advertisement

फिल्मसिटीत पद्मावतीसाठी 'नाटकी' आंदोलन


फिल्मसिटीत पद्मावतीसाठी 'नाटकी' आंदोलन
SHARES

पद्मावती चित्रपटाच्या वादावरून राजकारण्यांना विरोध करण्यासाठी रविवारी दुपारी विविध चित्रपट संघटना गोरेगावातील फिल्मसिटीत एकत्र आल्या. मात्र १५ मिनिटे निषेध नोंदवून हे आंदोलन त्वरीत गुंडाळण्यात आलं. विशेष म्हणजे जेव्हा हे आंदोलन सुरू होतं तेव्हा फिल्मसिटीतील बहुतांश सेटवर चित्रपटाचं शुटींग सुरू होतं. या नाटकी आंदोलनात जवळपास ८०० जण उपस्थित असले, तरी एकही मोठा कलाकार सहभागी झाला नव्हता.


१५ मिनिटांचा 'ब्लॅक आऊट'

भारतीय सिनेमा आणि टेलिव्हिजन मालिका दिग्दर्शकांच्या एकूण १९ संघटनांनी हे आंदोलन केले. गोरेगावमधील फिल्मसिटीत कलाकार, दिग्दर्शक, मेकअपमन, टेक्निकल स्टाफ असे एकूण ८०० जण सहभागी झाले होते. यामध्ये ज्युनिअर कलाकारांचा विशेष सहभाग होता. यावेळी केवळ १५ मिनिटे शुटींग बंद ठेऊन कलाकार आणि टीमने आंदोलनाची औपचारीकता केली.


चित्रपट बघूनच निर्णय घ्या

बॉलिवूड कलाकारांनी याआधीच भन्साळी यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. चित्रपट बघितल्यानंतरच मत व्यक्त करण्यात यावं आणि निर्णय घ्यावा, अशी मागणी अनेक कलाकारांनी केली. त्याचबरोबर ठिकठिकाणी पद्मावतीच्या खास शोचं आयोजन करण्यात यावं, अशी मागणीही अनेक कलाकरांनी केली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा