करण जोहरची जुळी मुलं अखेर घरी आली


  • करण जोहरची जुळी मुलं अखेर घरी आली
SHARE

मुंबई - बॉलिवूड निर्माता करण जोहरने आपल्या जुळ्या मुलांना रुग्णालयातून घरी आणले आहे. मसरानी रुग्णालयात करण जोहरच्या दोन जुळ्या मुलांचा 7 फेब्रुवारीला जन्म झाला. मुलांचा जन्म वेळेपूर्वी झाला. त्यामुळे त्याच्या मुलांना रुग्णालयात निगराणीखाली ठेवण्यात आले होते. रुही आणि यश अशी या दोघा मुलांची नावे आहेत. जवळपास दीड महिने रुही आणि यश रुग्णालयात होते. दीड महिन्यानंतर करणने रुही आणि यश दोघांना घरी आणले. मुलांना घरी घेऊन जातानाचा त्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

करण जोहरने सरोगसीद्वारे एकल पालकत्व स्विकारले होते. त्यावर सपाचे नेते अबु आझमी यांनीही या मुद्द्यावरून करण जोहरवर टीका केली होती. "तुला लग्न करायला मुलगी सापडली नाही का? तुझ्यात काही कमतरता आहे का?," असा प्रश्न अबु आझमी यांनी उपस्थित केला होता. "सरोगसी पेक्षा एका गरीब मुलाला तरी दत्तक घ्यायला हवं होतं," असा टोलाही आझमी यांनी लगावला होता.


संबंधित विषय
ताज्या बातम्या