दहा चित्रपट..दहा क्लासिक!

दादर - चित्रपट हा तसा आपल्यापैकी बहुतेकांच्या जिव्हाळ्याचा विषय. अशाच सिनेमावेड्या रसिकांसाठी त्यामुळेच भारतीय चित्रपटातील इतिहासात अजरामर झालेल्या दहा हिंदी सिनेमांचा प्रवास कथन करणारं 'दहा क्लासिक' हे पुस्तक रसिकांच्या भेटीला आलंय. पत्रकार अाणि लेखिका अनिता पाध्ये यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचं प्रकाशन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. अनिता पाध्ये यांनी भारतीय चित्रपटांमध्ये एक क्लास निर्माण केलेले दो बिघा जमीन, प्यासा, दो आँखे बारह हाथ, मदर इंडिया, मुगल-ए-आझम, गाईड, तीसरी कसम, आनंद, पाकिजा, उमराव जान या दहा चित्रपटांविषयी या पुस्तकात लिखाण केलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील यासाठी अनिता पाध्ये यांचं भरभरुन कौतुक केलं. दहा क्लासिक या पुस्तकामुळे सिनेमाचा इतिहास जाणण्याची एक नवी पर्वणी रसिकांना मिळणार असल्याचं मत फिल्म निर्देशक एन.चंद्रा यांनी मांडलं. अनिता पाध्ये यांचं पाचवं दहा क्लासिक हे पुस्तक सिनेमाप्रेमींसाठी चित्रपट इतिहासाचं नवं दालन उघडणार यात काही शंका नाही. 

 

Loading Comments