Advertisement

'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर कंगनाचे ठुमके!


'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर कंगनाचे ठुमके!
SHARES

मुंबई - झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ची हवा बॉलिवूडमध्येही पोहोचलीय. आजवर बॉलिवूडमधील दिग्गजांनी या मंचावरून आपल्या चित्रपटांची प्रसिद्धी केलीय. या यादीमध्ये आता आणखी एका नावाची भर पडणार आहे. आणि ते नाव म्हणजे बॉलिवूडची ‘क्विन’ कंगना राणावत. आपल्या आगामी 'रंगून' चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी कंगनाने थुकरटवाडीत हजेरी लावली होती. येत्या सोमवारी 20 फेब्रुवारीला रात्री 9.30 वाजता हा भाग झी मराठीवरून प्रसारीत होणार आहे.

एक सशक्त अभिनेत्री अशी ओळख कंगनाला ज्या चित्रपटाने मिळवून दिली त्या क्विन चित्रपटाची थुकरटवाडीच्या मंडळींनी सादर केलेली आवृत्ती बघून कंगनाला हसू आवरता आले नाही. या मंडळींसोबत कंगनाने 'लंडन ठुमकदा' गाण्यावर ताल धरत नृत्यही सादर केले. विशाल भारद्वाज यांचे दिग्दर्शन असलेला ‘रंगून’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून यात कंगना मुख्य नायिकेच्या भूमिकेत आहे. तर शाहिद कपूर आणि सैफ अली खान असे दोन तगडे अभिनेते या चित्रपटात आहेत. याच चित्रपटाच्या निमित्ताने कंगना पहिल्यांदाच एका मराठी कार्यक्रमात हजर झाली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा