Advertisement

एआयबी प्रकरणी 'यांना' दिलासा


एआयबी प्रकरणी 'यांना' दिलासा
SHARES

एआयबी या कार्यक्रमात महिलांविषयी अश्लील शेरेबाजी करणाऱ्या अभिनेत्यांसंह इतरांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने याप्रकरणी दाखल झालेल्या इतर याचिकांची एकत्रित सुनावणी घेत त्यांच्याविरोधात दाखल आरोपपत्र करण्याच्या प्रक्रियेला पुन्हा एकदा स्थगिती कायम ठेवली आहे.


काय आहे प्रकार?

डिसेंबर 2014 मध्ये एआयबी रोस्ट या कार्यक्रमात रणवीर सिंग आणि अर्जुन कपूर या अभिनेत्यांसह इतरांनी महिलांच्या बाबतीत अश्लील विनोद केले होते. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अॅड आभा सिंग यांनी विरोध केला होता. शिवाय या अभिनेत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर गिरगांव न्यायालयात संतोष दौंडकर यांनी तक्रार दाखल केली. न्यायालयाने या तक्रारीची दखल घेत अश्लील शेरेबाजी करणाऱ्या संबंधीत व्यक्तींवर गुन्हा नोंदवण्याचे आदेश पोलिसांना दिले. त्यानंतर रणवीर सिंग आणि अर्जुन कपूरसह इतरांनी गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका हायकोर्टात दाखल केली.


यासर्वांना दिलासा

या याचिकेवर न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली असता यावेळी समाजात एकीकडे महिलांवर अत्याचार होत असताना सार्वजनिक ठिकाणी महिलांवर इतक्या खालच्या पातळीवर विनोद कसे केले जाऊ शकतात? या कार्यक्रमात दीपिका आणि आलिया यांसारख्या या तरुण पिढींच्या प्रतिनिधी करणार्‍या अभिनेत्री या विनोदावर कसे काय हसू शकतात? असा सवाल यावेळी न्यायालयाने उपस्थित केला. या प्रकरणात रणवीर सिंग आणि अर्जुन कपूर सह करण जोहर, दीपिका पदुकोण, आलिया भट यांच्यासह कार्यक्रमाच्या आयोजकांचाही समावेश होता. याप्रकरणी आरोपपत्र करण्याच्या प्रक्रियेला पुन्हा एकदा स्थगिती देत न्यायालयाने यासर्वांना तुर्तास तरी दिलासा दिला आहे. 


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा