आता टक्कर ध्यानीमनी आणि फुगेची

Mumbai
आता टक्कर ध्यानीमनी आणि फुगेची
आता टक्कर ध्यानीमनी आणि फुगेची
See all
मुंबई  -  

मुंबई - गेल्या वर्षी एकाच दिवशी चित्रपटांचं प्रदर्शन झाल्यामुळे अनेक चित्रपटांना मोठा फटका बसला होता. मात्र, या अपयशामधून मराठी चित्रपटसृष्टी अजूनही काही बोध घ्यायला तयार आहे असं दिसत नाही. येत्या फेब्रुवारी महिन्यात फुगे आणि ध्यानीमनी हे दोन महत्त्वाचं चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहेत. फुगे चित्रपटाचं दिग्दर्शन स्वप्ना वाघमारे-जोशी यांनी केलं असून या चित्रपटामध्ये सुबोध भावे आणि स्वप्निल जोशी हे सध्याचे दोन आघाडीचे कलाकार एकत्र झळकले आहेत. मूळ नियोजनानुसार हा चित्रपट गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होणार होता. मात्र, केंद्रसरकारच्या निश्चलनीकरण मोहिमेमुळे या चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकललं गेलं. ध्यानीमनी या चित्रपटाची निर्मिती महेश मांजरेकर यांची असून दिग्दर्शन चंद्रकांत कुलकर्णी यांनी केलं आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून खुद्द अमिताभ बच्चन आणि सलमान खान यांनी त्यास पसंती दिली आहे. मात्र एकाच दिवशी दोन चित्रपट प्रदर्शित होणार असल्यामुळे उत्पन्नाच्या विभागणीचा फटका या चित्रपटांना बसण्याची भीती वितरकांतर्फे व्यक्त केली जात आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.