‘ब्रेव्हहार्ट’ थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये

  Pali Hill
  ‘ब्रेव्हहार्ट’ थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये
  मुंबई  -  

  मुंबई - मराठी चित्रपटसृष्टीत अनेक नाविन्यपूर्ण विषयांवर चित्रपटांची निर्मिती होतेय. याच पार्श्वभूमीवर अनुभवी बंगाली दिग्दर्शक दासबाबू ‘ब्रेव्हहार्ट जिद्द जगण्याची’ हा सत्यघटनेवर आधारित मराठी चित्रपट घेऊन येताहेत.

  ‘निखिल फिल्म्स’ची प्रस्तुती असलेल्या ‘ब्रेव्हहार्ट’ चित्रपटाची 15 व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवातल्या मराठी चित्रपट विभागात निवड करण्यात आलीय. मुंबईत येत्या 15 डिसेंबर ते 22 डिसेंबर या कालावधीत हा महोत्सव होणार आहे.
  ‘ब्रेव्हहार्ट’ चित्रपटात एका मुलाच्या दुर्दम्य इच्छाशक्तीची आणि जिद्दीची कहाणी आहे. सच्चिदानंद कारखानीस आणि संतोष मोकाशी निर्माते आहेत. चित्रपटाची पटकथा-संवाद आणि गीतं श्रीकांत बोजेवार यांनी लिहिली असून अर्णब चटर्जी यांनी संगीत दिलंय. या चित्रपटात संग्राम समेळ आणि धनश्री काडगांवकर या युवा जोडीसह अरुण नलावडे, अतुल परचुरे, सुलभा देशपांडे, किशोर प्रधान, डॉ. विलास उजवणे, विजय चव्हाण, इला भाटे, अभय कुलकर्णी, शमा निनावे, कु. अथर्व तळवलकर, स्वामीकुमार बाणावलीकर आदींच्या भूमिका आहेत.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.