Advertisement

गायक पपॉन अडचणीत, फेसबुुक लाईव्हवर घेतलं स्पर्धक मुलीचं चुंबन


गायक पपॉन अडचणीत, फेसबुुक लाईव्हवर घेतलं स्पर्धक मुलीचं चुंबन
SHARES

'मोह मोह के धागे' या गाण्यामुळे लोकप्रिय झालेला आणि रिअॅलिटी शो व्हॉईस ऑफ इंडिया या शोमध्ये सध्या परिक्षक असलेला गायक पपॉन याने स्पर्धक मुलीचं जबरदस्तीने चुंबन घेतल्याप्रकरणी त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 



व्हॉईस ऑफ इंडिया किड या रिअॅलिटी शोच्या होळी स्पेशल भागाच्या चित्रीकरणादरम्यान त्याने हे कृत्य केलं आहे. पपॉनने हा व्हिडिओ त्याच्या फेसबुक अकाऊंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये तो अल्पवयीन मुलीचं चुंबन घेताना दिसत आहे. सोशल मीडियावरही हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.


सुप्रीम कोर्टाच्या वकिलाने घेतला आक्षेप

हा व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर सुप्रीम कोर्टाचे वकील रूना भुयान यांनी आक्षेप घेत पपॉन विरोधात तक्रार दाखल केली आहे. पपॉनची ही कृती चुकीची आहे. त्या अल्पवयीन मुलीच्या चेहऱ्याला रंग लावतानाच त्याने तिचं चुंबन घेतलं. हा व्हिडिओ पाहून रिअॅलिटी शो मध्ये सहभागी झालेल्या त्या उल्पवयीन मुलीबद्दल मला चिंता वाटू लागली आहे, असं त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.


चॅनलचा खुलासा

दरम्यान हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर अँड टीव्हीकडून खुलासा करण्यात आला आहे. 'आम्ही व्हाईस ऑफ इंडिया या शोमध्ये सहभाग घेतलेल्या प्रत्येक स्पर्धकाच्या सुरक्षेची जबाबदारी आमची आहे आणि ती योग्य रित्या पार पाडण्याचा प्रयत्न करतो. याशिवाय आम्ही आणि आमच्या प्रोडक्शन हाऊसने राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग (एनसीपीसीआर) यांच्या मार्गदर्शन तत्वाचा आणि इतर कायद्याचं नेहमीच पालन केलं आहे. आम्ही या प्रकरणी स्पर्धकांच्या सोबत असू आणि सर्व बाजूने सहकार्य करू'.   






Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा