सिनेस्टार्सचा कॅन्सरग्रस्तांसाठी रॅम्पवॉक

Worli, Mumbai  -  

वरळी - कॅन्सरग्रस्तांना आर्थिक मदत व्हावी यासाठी कॅन्सर पेशंट्स ॲण्ड असोसिएशन(सीपीएए) या संस्थेने पुढाकार घेतला आहे. यासाठी रविवारी मुंबईच्या एनएससीआय क्लबमध्ये रॅम्पवॉकचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अभिनेता अमिताभ बच्चन, वरुण धवन, आलिया भट्ट, लुलिया वैंतूर, हिमेश रेशमिया, प्रिया बापट हिच्यासह शेकडो कलाकारांनी पुढाकार घेतला. कॅन्सर पेशंट्स ॲण्ड असोसिएशन ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून कॅन्सरग्रस्तांसाठी काम करते. या संस्थेसोबत फॅशन डिझायनर शायना एनसीही गेल्या 20 वर्षांपासून जोडल्या गेल्या आहे.

Loading Comments