मॅरेथॉनसाठी सेलिब्रेटींचीही मांदियाळी

 Pali Hill
मॅरेथॉनसाठी सेलिब्रेटींचीही मांदियाळी
मॅरेथॉनसाठी सेलिब्रेटींचीही मांदियाळी
मॅरेथॉनसाठी सेलिब्रेटींचीही मांदियाळी
मॅरेथॉनसाठी सेलिब्रेटींचीही मांदियाळी
मॅरेथॉनसाठी सेलिब्रेटींचीही मांदियाळी
See all

मुंबई - मुंबईत सध्या मॅरेथॉनमय वातावरण झालं आहे. कामाच्या व्यापातून वेळ काढत मुंबईकर 14 व्या मॅरेथॉनसाठी धावत आहे. तर यात सिनेसृष्टी तरी कशी मागे राहिल. मॅरेथॉनमध्ये सहभागी स्पर्धकांचा उत्साह वाढावा म्हणून बॉलिवुड कलाकार ही उपस्थित राहिले.

अभिनेता राहुल बॉस, जॉन अब्राहम यांनी स्पर्धकांचा मोठा उत्साह वाढवला. बॉलिवुड कलाकारांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपली पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबत उपस्थित होते. तसंच त्यांच्यासोबत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी देखील हजेरी लावली. माजी खासदार प्रिया दत्त ही उपस्थित होत्या. तसंच प्रसिद्ध क्रिकेट कमेंटेटर हर्ष भोगले यांनी देखील मॅरेथॉनला हजेरी लावत स्पर्धकांचा उत्साह वाढवला.

 

Loading Comments