• मकरसंक्रांत स्पेशल 'चला हवा येऊ द्या'
  • मकरसंक्रांत स्पेशल 'चला हवा येऊ द्या'
  • मकरसंक्रांत स्पेशल 'चला हवा येऊ द्या'
  • मकरसंक्रांत स्पेशल 'चला हवा येऊ द्या'
  • मकरसंक्रांत स्पेशल 'चला हवा येऊ द्या'
SHARE

मुंबई - झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमात या आठवड्यात संक्रांतीच्या सणाचं औचित्य साधत काही खास जोड्या प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. विविध क्षेत्रांत आपल्या कार्याने मराठीचा ठसा उमटवणाऱ्या काही खास व्यक्तिमत्वांचे वेगळे पैलू उलगडण्याचा प्रयत्न या भागांमधून होणार आहे. क्रिकेटच्या विश्वात केवळ मैदानावरच नाही तर कॉमेंट्री बॉक्समध्ये बसूनही फटकेबाजी करता येते हे दाखवून देणारे सुप्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले सपत्निक या भागात उपस्थित आहेत. सरकारी वकील आणि सुप्रसिद्ध न्यायालयीन खटले हा उल्लेख आला की डोळ्यासमोर येणारं एकमेव नाव म्हणजे अॅड. उज्ज्वल निकम. या खटल्यांमागचे काही खास किस्से या भागांमधून त्यांच्याचकडून प्रेक्षकांना ऐकायला मिळतील. याशिवाय या भागात सुप्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव आणि पत्नी मेघना जाधव, लोकप्रिय अभिनेता प्रसाद ओक आणि पत्नी मंजिरी ओक यांच्याकडूनही अनेक मजेदार किस्से ऐकायला मिळतील. राधा ही बावरी फेम अभिनेत्री श्रुती मराठे नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. लग्नानंतरची तिची ही पहीलीच मकर संक्रात. यानिमित्ताने ती आपला जोडीदार गौरव घाटणेकरसह यात सहभागी झाली होती. त्यांच्याचकडूनही अनेक धम्माल किस्से प्रेक्षकांना बघायला मिळतील. हे दोन्ही भाग येत्या सोमवारी आणि मंगळवारी रात्री 9.30 वा. झी मराठीवर प्रसारित होतील.

संबंधित विषय
ताज्या बातम्या