आवाज करंडक स्पर्धेत 'चऱ्हाट' अव्वल

Prabhadevi, Mumbai  -  

दादर - अरे आवाज कोणाचा...येऊन येऊन येणार कोण?.. अशा घोषणा दादरच्या रविंद्र नाट्य मंदिरात बुधवारी घुमत होत्या. निमित्त होतं आवाज करंडक एकांकिका स्पर्धेचं. स्पर्धेची अंतिम फेरी बुधवारी मोठ्या उत्साहात पार पडली. अनेक दर्जेदार एकांकिकांचं सादरीकरण या वेळी करण्यात आलं. शारदा प्रतिष्ठान तर्फे पहिल्यादांच एकांकिका स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं.

या अंतिम फेरीसाठी कॉमेडी अभिनेता जॉनी लिव्हर, अभिनेत्री मेघा घाडगे यांची खास उपस्थिती होती. प्राथमिक फेरीत 40 एकांकिकांनी सहभाग घेतला होता. त्यातील 8 एकांकिकांना अंतिम फेरीत जाण्याची संधी मिळाली होती.

गौतम बुध्दांची शिकवण, शेतकरी समस्या, स्त्री समस्या अशा अनेक गंभीर विषयांना एकांकिकेच्या माध्यमातून हात घालण्याचा प्रयत्न या वेळी करण्यात आला. अस्मिता प्रोडक्शन मुंबईची चर्‍हाट ही एकांकिका अव्वल ठरली.. तसंच द्वितीय क्रमांक इंद्रधनू मुंबईची विभवांतर आणि तिसरा क्रमांक नाट्यवाडा औरंगाबादच्या पाझर या एकांकिकेला मिळाला.

Loading Comments