घाटकोपर – रोड अपघातात अनेकांना जीव गमवावा लागतो, तर काहींना कायमचे अपंगत्व येते. या अपघाताच्या घटना वाढण्याच्या मागे कुठेतरी आपणसुद्धा जवाबदार आहोत. मद्यपान करून गाडी चालवण्यास सक्त मनाई असूनसुद्धा काही जण मद्यधुंदावस्थेत गाडी चालवतात. त्यामुळे अपघात मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे या वाढत्या अपघातांवर आळा बसण्यासाठी घाटकोपरमध्ये एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला.
हिरो होंडाच्या वतीने शनिवारी सिटी मॉलमध्ये आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित केला गेला. या वेळी लहान मुलांचे आवडते हिरो असलेले कार्टुनमधील पात्र भीम आणि चुटकी यांना बोलवण्यात आलं. या दोघांच्या माध्यमातून वाहतूक नियमांचे पालन कशा प्रकारे करावे. छोटा भीम आणि चुटकीने बच्चेकंपनीसोबत मोठ्यांनासुद्धा वाहतूक सुरक्षिततेचे धडे दिले गेले. यात लहान-मोठ्यांना हेल्मेट घालणे, लाल, पिवळा आणि हिरवा या सिग्निलचे महत्त्वही सांगितले.