अजिंक्य देवच्या हस्ते ‘सिनेमा घर’चं प्रकाशन

प्रसारमाध्यमांमध्ये कार्यरत असणारे असंख्य पत्रकार मराठीसह हिंदी सिनेसृष्टीचं जवळून निरीक्षण करत असतात. हेच निरीक्षण काहीजण पुढे पुस्तक रूपातही पुढे आणतात. यात आघाडीवर असलेल्या ज्येष्ठ पत्रकार दिलीप ठाकूर यांच्या ‘सिनेमा घर’ या नव्या कोऱ्या पुस्तकाचं प्रकाशन अभिनेता अजिंक्य देव यांच्या हस्ते करण्यात आलं आहे.

SHARE

४१ वं पुस्तक

दिलीप ठाकूर यांचं ‘सिनेमा घर’ हे ४१ वं पुस्तक आहे. यापूर्वी त्यांनी बऱ्याच पुस्तकांच्या माध्यमातून आपला अनुभव वाचकांसोबत शेअर केला आहे. या पुस्तकातही वाचकांना सिनेसृष्टीविषयक लेख वाचायला मिळणार आहेत. ठाकूरांनी दीर्घकाल सिनेसृष्टीत केलेली भटकंती, त्यांचं निरीक्षण, कलाकारांच्या भेटीगाठी, नव्या-जुन्या चित्रपटांचा अनुभव याचं सार ‘सिनेमा घर’ या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी वाचकांसमोर आणलं आहे.

लेख आणि किस्से

मराठी नववर्षाच्या आदल्या दिवशी अजिंक्य देव यांनी जुहू येथील रमेश देव प्राॅडक्शनच्या कार्यालयात ‘सिनेमा घर’ या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. एखाद्या भव्य-दिव्य प्रकाशन सोहळ्यात या पुस्तकाचं अनावरण करण्यात आलं नसलं तरी यातील लेख आणि किस्से सिनेसृष्टीच्या भव्य-दिव्यतेचं दर्शन घडवणारे आहेत. त्यामुळं हे पुस्तक वाचकांना आपसुकच आकर्षित करेल, अशी आशा व्यक्त करत अजिंक्य यांनी ‘सिनेमा घर’ला मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.

ठाणे येथील अनघा प्रकाशननं ‘सिनेमा घर’ या पुस्तकाचं प्रकाशन केलं आहे. ठाकूर यांनी यापूर्वी लिहिलेली ‘आडपडदा’ आणि ‘सिनेमा टॉकीज’ यांसारखी ४० पुस्तक आज अनेक वाचनालयं आणि वाचकांच्या संग्रही आहेत. ‘सिनेमा घर’ हे नवीन पुस्तकही वाचकांच्या पसंतीस उतरेल. ज्यामुळं पुढील पुस्तक लिहिण्यास नवस्फूर्ती मिळेल, अशी आशा ठाकूर यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा -

मोफत पहा 'आमच्या 'ही'चं प्रकरण'!

'मोदी : जर्नी ऑफ अ कॉमन मॅन' १० भागांची मालिकासंबंधित विषय
ताज्या बातम्या