'मोदी : जर्नी ऑफ अ कॉमन मॅन' १० भागांची मालिका

मोदींवर आधारित असलेल्या सिनेमापूर्वी सिरीज प्रदर्शित होणं ही मोदींच्या चाहत्यांसाठी आनंददायी बाब ठरली आहे. या निमित्तानं मोदी घराघरात पोहोणार आहेत.

  • 'मोदी : जर्नी ऑफ अ कॉमन मॅन' १० भागांची मालिका
SHARE

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनप्रवासावर आधारित असलेला सिनेमा कोर्ट-कचेऱ्यांच्या फेऱ्यात अडकलेला असताना दुसरीकडे 'मोदी : जर्नी ऑफ अ कॉमन मॅन' ही सिरीज मात्र बिनादिक्कत प्रदर्शित करण्यात आली आहे. 


मोदींचा प्रवास

इरॉस नाऊ या इरॉस इंटरनॅशनल पीएलसी या डिजिटल ओव्हर-द-टॉप (ओटीटी) दक्षिण आशियाई मनोरंजक व्यासपिठानं 'मोदी: जर्नी ऑफ अ कॉमन मॅन' ही सिरीज प्रदर्शित केली आहे. नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित असलेली ही १० भागांची मालिका आहे. मोदींच्या वयाच्या बाराव्या वर्षापासून त्यांचे तारुण्यातील आयुष्य ते भारताचे पंतप्रधान बनण्याचा त्यांचा प्रवास या सीरिजमध्ये दाखवण्यात आला आहे.


रोमांचकारी अनुभव 

राष्ट्रीय नेता बनलेली एक सामान्य व्यक्ती आज भारताचं पंतप्रधानपद भूषवत आहे. त्यांचा हा आश्चर्यचकित करणारा प्रवास स्क्रीनवर पाहणं हा अनेकांसाठी रोमांचकारी अनुभव असेल. यात मोदी विरोधक मात्र काही ना काही खुसपटं काढतील यात शंका नाही. पण मोदींवर आधारित असलेल्या सिनेमापूर्वी सिरीज प्रदर्शित होणं ही मोदींच्या चाहत्यांसाठी आनंददायी बाब ठरली आहे. या निमित्तानं मोदी घराघरात पोहोणार आहेत. 


एपिसोड ३५ ते ४० मिनिटांचा 

या सिरीजचं दिग्दर्शन उमेश शुक्ला यांनी केलं असून, लेखन मिहीर भुटा आणि राधिका आनंद यांचं आहे. फैजल खान, आशिष शर्मा आणि महेश ठाकूर यांनी मोदींच्या आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यावरील भूमिका साकारल्या आहेत. या सीरिजमधील प्रत्येक एपिसोड ३५ ते ४० मिनिटांचा आहे. मोदींच्या आयुष्यातील बऱ्याच महत्त्वाच्या घटना आणि प्रसंग यात आहेत. इरॉस नाऊच्या या ओरिजनल सीरिजची निर्मिती उमेश शुक्ला आणि आशिष वाघ यांच्या बेंचमार्क पिक्चर्सतर्फे करण्यात आली आहे.


आनंददायी काम

'मोदी : जर्नी ऑफ अ कॉमन मॅन'बद्दल उमेश शुक्ला म्हणाले की, भारतात लक्षणीय बदल घडवून आणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित ही ओरिजनल सीरिज बनवणं हे आनंददायी काम होतं. नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यातील आजवर समोर न आलेल्या अनेक बाबी प्रेक्षकांसमोर आणणं ही सन्मानाची बाब असून ते तितकंच आव्हानात्मकही होतं. ही ओरिजनल सीरीज मोदींनाही खूप आवडेल याची मला खात्री आहे.हेही वाचा -

शाहरुखसोबत झळकणार मराठमोळी ऋचा

‘ललित २०५’ आणि ‘छत्रीवाली’मध्ये उभारली गुढी
संबंधित विषय
ताज्या बातम्या