Advertisement

राजेश श्रृंगारपुरेच्या एन्ट्रीमुळे 'बिग बॅास'मध्ये पुन्हा फुलणार प्रेमकथा?


राजेश श्रृंगारपुरेच्या एन्ट्रीमुळे 'बिग बॅास'मध्ये पुन्हा फुलणार प्रेमकथा?
SHARES

सध्या महाराष्ट्रभर 'बिग बॅास' मराठीचं लोण पसरलं आहे. 'बिग बॅास'च्या घरात काय घडत आहे याचीच चर्चा सगळीकडे ऐकायला मिळते. अशातच एखाद्या वादग्रस्त सदस्याची पुन्हा घरात एन्ट्री झाली तर? होय, असंच काहीसं होणार आहे. अभिनेता राजेश श्रृंगारपुरे पुन्हा 'बिग बॅास'मध्ये दिसणार आहे.

राजेश पुन्हा नेमका कधी बिग बॅासच्या घरी जाणार आहे ते समजलं नसलं तरी वाईल्ड कार्ड एंट्रीद्वारे तो बिग बॅासच्या घरातील सदस्य बनणार असल्याचं समजतं. बिग बॅासमधील राजेश आणि रेशम टिपणीस यांच्यातील जवळीक वादग्रस्त ठरली होती. बिग बॅासच्या घरातून बाहेर पडल्यानंतर मात्र रेशम आपली जीवाभावाची मैत्रीण असल्याची प्रतिक्रिया राजेशने दिली होती. राजेशच्या पुनरागमनामुळे दोघांमध्ये पुन्हा प्रेमकथा फुलणार की आणखी काय घडणार? ते लवकरच समजेल.

२० मे रोजी बिग बॅासमधून आऊट झालेल्या राजेश आणि बिग बॅास या शोवर अश्लिलता पसरवल्या प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला होता. चार आठवड्यांच्या विश्रांतीनंतर राजेश पुन्हा एकदा या घरात दिसणार असल्यानं उत्सुकता वाढली आहे. घरात त्याचं वास्तव्य काही दिवसांकरीता असेल की अखेरपर्यंत? ते समजलेलं नाही. पण राजेशच्या एंट्रीमुळे बिग बॅासच्या घरात पुन्हा खळबळ उडणार हे मात्र नक्की.



हेही वाचा

अमराठी संगीतकारांचा मराठी बाणा


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा