Advertisement

बिग बॉस मराठीच्या घरात पुढे काय?


बिग बॉस मराठीच्या घरात पुढे काय?
SHARES

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सोमवारी नॉमिनेशन प्रक्रियेसाठी ग्रामसभा भरली. ज्यामध्ये घरामधील सदस्यांच्या जोड्या करण्यात आल्या. या दोन्ही सदस्यांनी बिग बॉस मराठीच्या घरामध्ये का रहावं तसेच दुसरा सदस्य घरामध्ये रहाण्यास कसा अयोग्य आहे? हे पंचायतीमधील इतर सदस्यांना पटवून द्यायचं होतं. ज्यामध्ये सई, उषा नाडकर्णी, आस्ताद आणि सुशांत हे घरातून बाहेर घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये नॉमिनेट झाले. आता मंगळवारी रेशम आणि मेघामध्ये कोण नॉमिनेट होणार हे बघणं रंजक असणार आहे.


पुढील टास्क काय?

आजवर बिग बॉस मराठीच्या घरामध्ये पार पडलेल्या टास्कमध्ये सदस्यांनी शक्ती आणि युक्तीचा चलाखीने वापर करावा, असा आदेश होता. अस सांगूनही घरामध्ये युक्तीपेक्षा शक्तीचाचं वापर जास्त झाला. परंतु आता वेळ आली आहे, खऱ्या अर्थाने सदस्यांच्या युक्तीची शक्ती तपासण्याची. बिग बॉस सदस्यांवर आजच्या आठवड्यातील साप्ताहिक कार्य सोपवणार आहेत. या कार्याचं नावं आहे “मर्डर मिस्ट्री”. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काही सदस्यांचा खून होणार आहेत, परंतु हे खून शारीरिक नसून सांकेतिक असेल. या कार्यामध्ये कोणीतरी एक खुनी असेल तर कोणी एक गुप्तहेर असेल आणि काही सामान्य नागरिक. या प्रकारचा अनोखा टास्क पहिल्यांदाच बिग बॉस मराठीच्या घरामध्ये होणार आहे.


मंगळवारच्या भागात काय?

आस्तादने हर्षदा, जुई, मेघा यांना एक चिठ्ठी घरातून आल्याचं सांगितलं तसेच फोन आल्याचं देखील सांगितले ज्यामध्ये त्याच्या जवळच्या व्यक्तीचं लग्न ठरणार असून त्याला वाटल्यास अशा प्रसंगी तो घर सोडून जाऊ शकतो आणि त्याला चोवीस तासांचा अवधी देखील देण्यात आला आहे, असं तो त्यांना सांगणार आहे. आता नक्की काय झालं आहे? हे सत्य आहे की, यात कुठलं गुपित दडलेलं आहे? हे मंगळवारच्या भागामध्ये प्रेक्षकांना कळणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा