Advertisement

'अशा'प्रकारे उर्वशीची कोरोना विरुद्ध लढ्यासाठी मदत

बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलानं COVID 19 विरुद्ध सुरु असलेल्या लढाईसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

'अशा'प्रकारे उर्वशीची कोरोना विरुद्ध लढ्यासाठी मदत
SHARES

कोरोनाशी (Coronavirus Update) लढा द्यायला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी पुढे आले. अमिताभ बच्चन यांच्या पासून ते सोनू सूदपर्यंत अनेकांनी आपापल्या परीनं मदत केली. कुणी आपलं हॉटेल डॉक्टरांना दिलं तर कुणी गरजूंच्या अन्नाची सोय केली, तर कुणी पीपीई किट्सची व्यवस्था केली. आता या यादीत आणखी एक नाव जोडलं गेलं आहे. बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलानं COVID 19 विरुद्ध सुरु असलेल्या लढाईसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

उर्वशीनं ५ कोटी रुपये मदत म्हणून दिले आहेत. तिनं हे पैसे टिकटॉकच्या डान्स मास्टरक्लास मध्ये कमावले होते. ही रक्कम तिने क्राय, युनिसेफ आणि स्वदेशी फाऊंडेशनला दिली असून त्याचा वापर कोविड विरुध्द सुरु असलेल्या प्रयत्नांमध्ये केला जाणार आहे.

या मास्टरक्लास मध्ये उर्वशी रौतेलानं लोकांना झुम्बा, टबाटा, लॅटीन डान्स शिकवले आणि हे क्लास पूर्ण मोफत होते. या डान्स क्लास मध्ये १.८ कोटी लोक सामील झाले आणि त्यातून उर्वशीला ५ कोटी रुपये मिळाले असे समजते.

 उर्वशी या संदर्भात म्हणाली की, नेते, अभिनेते, खेळाडू आणि सर्वसामान्य नागरिक या संकटकाळात मदतीसाठी पुढे आला आहे त्या सर्वाना धन्यवाद. ही वेळच अशी आहे की सर्वांनी एकत्र उभे राहायला हवे. एकमेकांना सपोर्ट करायला हवे. त्यात कोणतीच देणगी छोटी नाही आणि मोठीही नाही. आपण सर्वानी एकत्र येऊन करोनाचा पराभव करायचा आहे. इतकेच नव्हे तर भविष्यातही गरजेनुसार मदतीसाठी तयार राहायचे आहे.



हेही वाचा

खरा हिरो! अभिनेता सोनू सूदनं केली हजारो कामगारांची घरवापसी

'असं' करा KBC 12 चे ऑनलाइन रजिस्ट्रेशन

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा