Advertisement

… जेव्हा बाबासाहेब खेळतात क्रिकेट

भारतीय घटनेचे शिल्पकार अशी ज्यांची जगभर ख्याती आहे अशा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनप्रवास सध्या छोट्या पडद्याच्या माध्यमातून घराघरात पोहोचत आहे. या मालिकेत आता बाबासाहेब क्रिकेट खेळताना दिसणार आहेत.

… जेव्हा बाबासाहेब खेळतात क्रिकेट
SHARES

भारतीय घटनेचे शिल्पकार अशी ज्यांची जगभर ख्याती आहे अशा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनप्रवास सध्या छोट्या पडद्याच्या माध्यमातून घराघरात पोहोचत आहे. या मालिकेत आता बाबासाहेब क्रिकेट खेळताना दिसणार आहेत.

स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारीत होणाऱ्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेतून बाबासाहेबांच्या आयुष्यातील सुख- दु:खाचे प्रसंग अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळत आहे. बाबासाहेबांची शिक्षणाची आवड ते मिळवण्यासाठीची तळमळ आपण मालिकेत पहातच आहोत. शिक्षणसोबतच क्रिकेट खेळणं हा बाबासाहेबांचा आवडता छंद होता. मालिकेच्या काही भागांमध्ये प्रेक्षकांनी ते अनुभवलंही आहे, पण ते छोट्या भीवाच्या रुपात. लहानग्या मंडळींना एकत्र करुन चिमुकला भीवा तासनतास क्रिकेटच्या खेळात रमे. परदेशातून उच्च शिक्षण घेऊन परतल्यानंतर बाबासाहेबांना बालपणीच्या दिवसांची पुन्हा एकदा आठवण झाली आणि त्यांनी बॅट हातात घेतली. नुकताच हा प्रसंग चित्रित करण्यात आला.

मालिकेत क्रिकेट खेळतानाचा हा प्रसंग चित्रित होत असताना खरोखरचा क्रिकेटचा सामना खेळण्यात आला. बाबासाहेबांची भूमिका साकारणाऱ्या सागर देशमुखलाही क्रिकेटची खूप आवड आहे. या मालिकेच्या शूटिंगच्या निमित्तानं आवडही जपता येत असल्याचा आनंद व्यक्त करत सागर म्हणाला की, मी कटारिया हायस्कूल पुणे या शाळेचा विद्यार्थी आहे. आमच्या शाळेत क्रिकेटची टीम खूप तगडी होती आणि लहानपणापासून मला क्रिकेट खेळायला खूप आवडायचं. शाळेच्या टीमकडून खेळण्याची कधी फारशी संधी मिळाली नाही, पण मग महाराणा प्रताप संघ, इंगळेज क्रिकेट क्लब या संघांकडून मी खेळलो आहे. ११ वी आणि १२ वी मध्ये शिकत असतानाही कॉलेजच्या संघाकडून खेळलो. पुण्याच्या एस. पी. कॉलेज, फर्ग्युसन कॉलेज, आय. एल्. एस. लॉ. कॉलेज या महाविद्यालयांच्या मैदानावर न जाणो कित्येक सामने मी खेळलो आहे.

आज मालिकेत जेव्हा बाबासाहेब क्रिकेट खेळत असतानाचा प्रसंग आम्ही शूट करत होतो, तेव्हा खरोखरचा सामना रंगला. बाबासाहेबांच्या नावाचा जयघोष, टाळ्या, धावा काढणं असे जोशपूर्ण वातावरण सेटवर होतं. सीन शूट झाल्यावर पुन्हा एकदा या थोर महामानवाच्या कलागुणांचा विचार करून थक्क झालो.



हेही वाचा -

मॅगीचा ‘टकाटक’ अंदाज पाहिला का?

या कलाकारानं चाखली पर्णच्या प्रँन्क्सची चव




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा