Advertisement

दादांची 'दादागिरी'च हिट


SHARES

मुंबई - ढगळ हाफ पॅन्ट, त्याबाहेर लोंबळणारी नाडी, चेहऱ्यावर इरसाल आणि भाबडेपणाचं, बेरकी डोळे आणि विनोदी ढंगातील संवादफेक. या वर्णनात बसणारी एकमेव व्यक्ती म्हणजे दादा कोंडके. प्रेक्षकांना खळखळून हसवणारे दादा आजही सगळ्यांच्या लक्षात आहेत. विनोदाची मेजवानी देणाऱ्या दादांच्या चित्रपटांना अफाट यश मिळालं. आजही दादांचे चित्रपट तसेच गर्दी खेचतायत. 14 मार्च 1998 रोजी दादांचा जन्म झाला होता. मुंबईतल्या भारतमाता सिनेमागृहात १४ मार्चपासून त्यांचे सिनेमे दाखवले जातायत. आंधळा मारतो डोळा, तुमचं आमचं जमलं, येऊ का घरात, आली अंगावर, राम राम गंगाराम, सासरचं धोतर असे गाजलेले चित्रपट तुम्ही इथे पाहू शकाल. प्रत्येक आठवड्याला नवा चित्रपट किंवा मग वन्स मोअर... दादांच्या चित्रपटांच्या या मेजवानीमुळे चाहते मात्र खुश झालेयत. सेन्सॉरच्या दंडेलीपुढे नमतं न घेणं, नियमांविरुद्ध जाण्याची खुमखुमी; शिवसेनेशी जवळीक, वादग्रस्त व्यक्तिगत आयुष्य आणि मृत्युनंतरही झालेले वाद. या सगळ्या पैलूंनंतरही दादांवर प्रेक्षकांनी प्रेमच केलं आणि अजूनही ते करतायत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा