ऐश्वर्या, हेमा आणि जीनत अमानला दादासाहेब फाळके एक्सलेंस पुरस्कार

 Mumbai
ऐश्वर्या, हेमा आणि जीनत अमानला दादासाहेब फाळके एक्सलेंस पुरस्कार
Mumbai  -  

यंदाच्या दादासाहेब फाळके एक्सलेंस पुरस्कार मिळवण्यात अभिनेत्रींनी बाजी मारली आहे. एेश्वर्या राय बच्चनला सरबजीत या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. हेमा मालिनी यांना कलाश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं तर झीनत अमानला जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. उत्कृष्ट लेखनासाठी जावेद अख्तर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. याव्यतिरिक्त बेस्ट दांडिया क्वीन म्हणून फाल्गुनी पाठक आणि शास्त्रीय संगीतासाठी अनूप जलोटा यांना पुरस्कार देण्यात आला. यासह सर्वोत्कृष्ट कॉमेडियन म्हणून राजू श्रीवास्तवला पुरस्कार देण्यात आला.

या पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री एेश्वर्या राय बच्चन व्यतिरिक्त उर्वशी रौतेला, टीव्ही अभिनेत्री सारा खान, दाक्षिणात्य अभिनेत्री मीनाक्षी दीक्षित बॉलिवूड गाण्याच्या नृत्यावर थिरकल्या.

Loading Comments