Advertisement

'छोटी मालकीण'मध्ये होणार दादूसचा धमाकेदार परफॉर्मन्स!


'छोटी मालकीण'मध्ये होणार दादूसचा धमाकेदार परफॉर्मन्स!
SHARES

स्टार प्रवाहवरील 'छोटी मालकीण' मालिकेच्या पहिल्या भागापासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. मालिकेत मुख्य भुमिकेत असणाऱ्या रेवतीच्या आयुष्यात पुढे काय होणार? याची चिंता प्रेक्षकांना सतावत आहे. रेवतीचं लग्न कोणाबरोबर होणार? हा प्रश्न सध्या सगळ्यांना सतावत आहे. मालिकेत लवकरच रेवतीच्या हळदी समारंभाचा प्रसंगही रंगणार आहे.  

संतोष चौधरी यांच्या धमाकेदार गाण्याचा परफॉर्मन्स स्टार प्रवाहच्या 'छोटी मालकीण' या मालिकेत पहायला मिळणार आहे. आगरी कोळी हळदीच्या गाण्यासाठी लोकप्रिय असलेले लाडके दादूस या गाण्यानं धमाल उडवून देणार आहेत.



'छोटी मालकीण' या मालिकेतील रेवतीच्या आयुष्याला कलाटणी मिळणार आहे.  रेवतीचं लग्न होणार की नाही? अशी वेळ आलेली असताना घरातला नोकर श्रीधर तिच्याशी लग्न करण्याची तयारी दर्शवतो. आपल्या छोट्या मालकिणीला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी, तिच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याचा तो निश्चय करतो. या लग्नादरम्यान मानपानावरून बराच गोंधळ उडतो, रुसवे-फुगवेही होतात.

पण श्रीधर आणि रेवाच्या लग्नाच्या हळदीचा खरा रंग चढणार आहे तो दादूसच्या दमदार परफॉर्मन्समुळे! दादूस त्यांच्या गाण्यानं हळदीचा कार्यक्रम कसा रंगवतात हे पहाणं आता उत्सुकतेचं आहे.



हेही वाचा

'छोटी मालकीण'मध्ये अक्षर कोठारीचा रांगडा लूक!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा