Advertisement

'छोटी मालकीण'मध्ये अक्षर कोठारीचा रांगडा लूक!

अभिनेता अक्षर कोठारी आता स्टार प्रवाहच्या 'छोटी मालकीण' या नव्या मालिकेत दिसणार आहे. या मालिकेत पिळदार मिशी असलेल्या रांगड्या लुकमध्ये 'श्रीधर' ही व्यक्तिरेखा तो साकारत आहे.

'छोटी मालकीण'मध्ये अक्षर कोठारीचा रांगडा लूक!
SHARES

स्टार प्रवाहवरच्या 'हे बंध रेशमाचे' किंवा 'आराधना' या मालिकामधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेला अभिनेता अक्षर कोठारी आता स्टार प्रवाहच्या 'छोटी मालकीण' या नव्या मालिकेत दिसणार आहे. या मालिकेत पिळदार मिशी असलेल्या रांगड्या लुकमध्ये 'श्रीधर' ही व्यक्तिरेखा तो साकारत आहे. आपल्या व्यक्तिरेखेवर नेहमीच मेहनत घेणाऱ्या अक्षरनं 'छोटी मालकीण'साठीही खास मेहनत घेतली आहे.

स्टार प्रवाहबरोबर अक्षर कोठारीचं जुनं नातं आहे. त्यानं स्टार प्रवाहच्याच 'हे बंध रेशमाचे' या मालिकेतून पदार्पण केलं होतं. त्यानंतर 'आराधना' या मालिकेतही काम केलं होतं. या दोन्ही मालिकांनी त्याला उत्तम अभिनेता म्हणून ओळख मिळवून दिली.



माझी प्रत्येक भूमिका वेगळी दिसावी यासाठी मी लुकचा विचार करतो, मेहनत घेतो. सुदैवानं आतापर्यंत माझा विचार योग्य ठरला आहे. 'श्रीधर' ही व्यक्तिरेखा वाचल्यावर माझ्या मनात काही चित्र तयार झालं. त्यात या श्रीधरला पिळदार मिशी असावी असं वाटत होतं. त्यामुळे मी मिशी पिळदार होण्यासाठी प्रयत्न केले.

अक्षर कोठारी , अभिनेता 


आपला पिळदार मिशीमधला लुक पाहिल्यानंतर स्टारप्रवाहनंही ती कल्पना मान्य केली, असं अक्षर म्हणाला. आपल्या व्यक्तिरेखेविषयी सांगताना अक्षर पुढे म्हणतो, 'हा 'श्रीधर' छोट्या शहरातला तरूण आहे. मीही सोलापुरसारख्या शहरातला असल्यामुळे श्रीधरच्या मानसिकतेचा नेमक्या पद्धतीनं विचार करू शकलो. स्टार प्रवाहनं अभिनेता म्हणून पहिली संधी दिली होती. त्यामुळे माझं आणि स्टार प्रवाहचं नातं खूप आपलेपणाचं आहे. 'छोटी मालकीण' या मालिकेच्या निमित्तानं मला घरी परत आल्यासारखं वाटतंय', असंही अक्षर म्हणाला.



या मालिकेत अक्षरबरोबर एताशा संझगिरी दिसणार आहे. एताशा 'रेवती' ही प्रमुख व्यक्तिरेखा साकारत आहे. एताशाची ही पहिलीच मालिका आहे. या मालिकेत ती डॉ. गिरीश ओक, वंदना वाकनीस, अक्षर कोठारी, निखिलराजे शिर्के, प्रदीप पंडित, प्रतीक्षा जाधव, पूजा नायक अशा अनुभवी कलाकारांबरोबर दिसणार आहे.



हेही वाचा

'या' मराठी गायिकेचं अकाऊंट झालं हॅक


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा