तृतीयपंथी बनले ‘डान्सिंग क्वीन’

    मुंबई  -  

    खार - तृतीयपंथी म्हटले की तुमच्या समोर एकच चित्र उभे राहते ते म्हणजे रेल्वे, रस्ते किंवा कोणत्या आनंदाच्या सोहळ्यात पैसे मागणारे. त्यांच्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन काही केल्या बदलत नाही. तृतीयपंथींना त्यांच्या अस्तित्वासाठी अक्षरश: झगडावे लागते. पण डान्सिंग क्वीन आणि हमसफर ट्रस्ट या दोन संस्था तृतीयपंथींच्या पाठिशी खंबिरपणे उभ्या आहेत. संस्थेद्वारे तृतीयपंथींना वेगवेगळ्या डान्स फॉर्म्स शिकवून त्यांच्यातील कलागुणांना प्रोत्साहन दिले जात आहे. यातील काही तृतीयपंथीय रस्त्यावर पैसे मागायचे तर काही वेश्या व्यवसाय करायचे. पण आता त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्याची ताकद डान्सिंग क्वीन ही संस्था देतेय. डान्सिंग क्वीन संस्थेद्वारे हे तृतीयपंथी अनेक रेस्टोरंटमध्ये डान्स शो करतात.

    Loading Comments

    संबंधित बातम्या

    © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.