'दंगल'चा 100 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश

 Pali Hill
'दंगल'चा 100 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश

मुंबई - अभिनेता आमीर खानच्या ‘दंगल’ सिनेमानं वीकेंडला मोठी कमाई केलीय. ‘दंगल’नं 100 कोटींचा टप्पा पार केलाय. सिनेमानं आतापर्यंत 106.95 कोटी रुपयांची कमाई केलीय. 'दंगल' सिनेमाचं कथानक हरियाणातील पैलवान महावीर सिंह फोगट यांच्या जीवनावर आधारीत आहे. या सिनेमात महावीर सिंह फोगट यांनी आपल्या मुली गीता आणि बबीता यांना कशाप्रकारे कुस्तीचं प्रशिक्षण देत आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू बनवलं हे दाखवण्यात आलंय.

Loading Comments